या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४५
शिवाजीचा पवाडा
कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा । छत्रपती शिवाजीचा ॥
लंगोट्यांस देई जानवीं पोषींदा कूणब्यांचा ।
काळ तो असे यवनांचा ॥
शिवाजीचा पिता शाहाजी पुत्र मालोजीचा ।
असे तो डौल जाहगिरीचा ॥
पंधराशे एकूणपन्नास साल फळलें ।
जुन्नर ते उदयांशी आलें ॥
शिवनेरी किल्ल्यामध्ये बाळ शिवाजी जन्मले
जिजीबाइस रत्न सांपडले ॥
हातापायांची नख बोट शुभ्र प्याजी रंगीलें।
ज्यानी कमळा लाजिवलें॥
वर खालीं टिया पोटऱ्या गांठी गोळे बांधले।
स्फटिकापरि भासले ॥
सान कटी सिंहापरी छाती मांस दुनावलें ।
नांव शिवाजी शोभलें।
राजहौंसी उंच मान माधे मांदे दोंदीलें।
जसा का फणीवर डोले ॥
एकसारखे शुभ्र दंत चमकू लागले ।
मोती लडी गुतिवलें ॥
रक्तवर्ण नाजूक होटी हातूं छपिवलें ।
म्हणोन बोबडे बोले॥
सरळ नीट नाक विशाळ डोळ्यां शोभले ।
विषावें मृग वनी गेले ॥