पान:Samagra Phule.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४४ महात्मा फुले : समग्र वाङ्मय तेव्हां थोडेसे लागी लागल्यासारखे झाले. नंतर दास केलेल्या व महाअरी क्षत्रियांचा अमर्याद द्वेष करून पहिल्यास भेद वाचून पाहाण्याची मनाई व दुसऱ्याचा स्पर्श होऊ न देण्याची वहिवाट चालू करून मनूसारख्या इतर क्रूर राजानी मनास मानेल तसी सूड घेण्याजोगी ज्यात ब्राह्मणांचे फक्त हित असीं नवी नवी कलमे घरांतल्या घरांत बनवून ग्रंथांचे पोटांत कोंबून काही कालानंतर दास केलेल्या सर्व क्षत्रियांस लटकेच उठविले की, हे ग्रंथ स्वतां देवाने लिहून ठेविले असे दाखवून मोटा धार्मिकपणाचा डौल घालून त्या दासांच्या मनांतच उत्तरोत्तर बिंबविण्याची सुरुवात केली. एवढेच करून स्वस्थ राहिले असे नाही, पण त्यांनी अखेरीस राहिलेल्या शेषद्वेषाचा सर्प कल्पून त्याचा बिछाना करून त्यावर सच्चिदानंद नारायणाच्या मूर्तीस उताणे पाडून त्याचे बेंबीचा देठ बाहेर ओढून काढून त्यांचे शेवटी कमळ करून त्यावर चार तोंडाचा ब्रम्हा बसवून हा देवाचा लेक त्याने हे सर्व भेद केले, देवाच्या लेकापुढे कोणाचे काय चालणार अशा नाना प्रकारच्या थोतांडी खोट्या गोष्टी बनवून दास केलेल्या क्षत्रियांस हळुहळु हे ईश्वरदत्त आहेत म्हणून, भासवून शिकवून त्या सर्व क्षत्रियांची धर्माच्या थापीनें असीं मानसाची कणसें करून टाकली आहेत हे सर्वांस माहीतच आहे. यापुढे जनाची तर नाहीच, परंतु मनाचीसुद्धा काडीमात्र लाज न धरितां शुद्र ब्रह्मयांच्या पायापासून जन्म पावले असें कोठें कोठें ग्रंथांत कोंबून लिहिले आहे. काय पायापासून शुद्र पुत्र प्रसविणे ही गोष्ट लहान अचंब्याची आहे असे माझ्याने म्हणवत नाही! परंतु जन्म देणे हा स्त्रियांचा धर्म असून शुद्ध ब्रह्मपुरुषाच्या पायापासून मूल जन्मविण्याने या जगात सर्वत्र जो सुष्टिक्रम चालत आला आहे त्याला बाध येतो. तसेच चालण्याचे काम पायांचे असून त्या पावापासून शुद्र पुत्र जन्मविला व त्याचप्रमाणे ब्रह्मयाच्या मुखापासून ब्राह्मण जन्मविला असे जर खरे आहे तर ब्रह्मयाचे मुख इतर दुसरे ततसंबंधी व्यापार करीत होते असे त्याच्या शिष्यमंडळीस कबूल करावे लागेल. यावरून असें साफ सिद्ध होतें की चार घरच्या चार पोरी मिळून घरांतल्या घरकुंडांत बराच लटक्यामुटक्यांचा खेळ खेळल्या. असो, याविषयी जास्ती चिकित्सा करून फटफजीती करीत बसणें त्यापेक्षा त्यांची क्षमा करून बाकीचे सर्व सुज्ञ वाचकांकडे सोपितो. हा लहानसा प्रयत्न सुज्ञ जनांस आवडल्यास आणखी याच मासल्याचे, तळी घातल्यापूर्वी क्षत्रियांमध्ये महासुभ्या (म्हसोबा) सारखे महावीर होऊन गेले यांचे पवाडे मोठ्या उल्हासाने सादर केले जातील. हा पवाडा एकंदर तयार करते वेळी माझे लहानपणाचे मित्र भंडारकर यांनी इतर दुसऱ्या लोकांसारखा पायांत पाय न घालता मला या कामांत नेहमी हिंमत देऊन वारंवार माझ्या कल्पना नीट जुळाव्यात म्हणून बरीच मदत दिली. यास्तव मी त्यांचा ऋणी आहे. व रे. बाबा पदमनजी व गंगाधरशास्त्री या उभयतानी शुद्ध करण्याविषयी मदत केली सबब त्यांचा आभारी आहे.