पान:Samagra Phule.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रस्तावना शिवाजी राजाच्या या पवाड्याचे आठ भाग केले आहेत. दरएक भागांत विषयांतर होऊ नये या भयास्तव सर्व भाग एकसारखे केले नाहीत. अति जुनाट यवनी व मेसर्स ग्रांडफ, मरी वगैरे इंग्रज लोकांच्या बहुतेक लेखी आधारावरून हा पवाडा केला आहे. कुणबी, माळी, माहार, मांग वगैरे पाताळी घातलेल्या क्षेव्यांच्या उपयोगी हा पवाडा पडावा असा माझा हेतु आहे. लांबच लांब मोठाले संस्कृत शब्द मुळीच घातले नाहीत व जेथें माझा उपाय चालेना तेथे मात्र लहानसहान शब्द निर्वाहापुरते घेतले आहेत. माळी कुणब्यांस समजण्याजोगी सोपी भाषा होण्याविषयी फार श्रम करून त्यांस आवडण्याजोग्या चालीने रचना केली आहे. जगत्कर्ता भगवान सर्व जगाचा चाळक आणि तोच सर्वांचा बुद्धिदाता आहे. त्यालाच आम्हा शूद्रांची दया आल्यावरून त्याने आपल्या परमप्रिय इंग्रज लेकरास राजा करून आम्हां क्षत्रियांस ब्रह्मराक्षसाच्या दाढेतून ओढून काढण्याकरिता हिंदुस्थानात पाठविले आहे व हे दयाळु इंग्रज लोक आम्हा गांजलेल्या अज्ञानी लोकांस खरें ज्ञान शिकवू लागल्यामुळे ब्राह्मणांनी बनविलेल्या मतलबी कूटापासून स्वतंत्र होण्याचे नेहमी आमच्या मनात डोहळे होऊ लागले आहेत. ब्राह्मणाच्या कूटाविषयी थोडासा येथे मासला लिहितों तो येणेप्रमाणे या जगांतील सर्व देशांचे इतिहास एकमेकांसी ताडून पाहातां या हिंदुस्थानांत मात्र ब्राह्मणांनी आपल्यास मोठ्या दिमाखाने उंच मानून परभू, कुणबी, माळी, मांग आणि महार इत्यादि, जातीचे हाडवैरी असल्याप्रमाणे त्यांचा मनापासून द्वेष करून त्यांस इतके नीच मानण्यांचे कारण काय असावे असें माझ्या मनात नेहमी घोळत होते. याविषयी इतर भाषेतील ग्रंथांवरून व ब्राह्मणाच्या एकंदर शूदांसी आचरणावरून असे सिद्ध होते की, ब्राह्मण लोकांचा या देशासीं काहीच संबंध नसतां ब्राह्मणांनी केवळ लोभाने या देशांत एकाएकी लागोपाठ हल्ले करून ज्या ज्या वेळी जे जे लोक या क्षेत्री हल्ल्यामध्ये सापडले त्यांस कैद करून ब्रह्मराजाने त्या सर्वांचे दास केले व त्यांनी तसेच चिरकाळ ब्राह्मणांच्या दास्यत्वांत रहावे म्हणून पुन्हा त्याच ब्रह्मयाने सत्तेच्या मदाने कायदे करून त्यांची अनेक पुस्तकें करून त्यांत अनेक तहेचे भेद करून ठेवले. नंतर काही दिवसांनी वेळ पाहून त्यांस भेद म्हणण्याचे सोडून वेद म्हणण्याचा प्रचार धातला असावा. ब्रह्मराजा मरताच बाकीच्या उरल्या क्षत्रियांनी ब्राह्मणांच्या हाती सांपडलेल्या बांधवांस ब्राह्मणांच्या दास्यत्वापासून सोडविण्याविषयी परशरामाशी एकवीस वेळां इतके निकराने लढले की त्यांचे अखेर महाअरी असें नांव पडले व त्या शब्दाचा पुढे महार असा अपभ्रंश झाला व त्या महाअरी क्षत्रियांसी लढता लढतां परशरामाचे इतके लोक मारले गेले की, ब्राह्मणांपेक्षा ब्राह्मण विधवा यांचा इतका भरणा वाढला की त्यांची नीट रीतीने व्यवस्था कसी ठेवावी याची मोठी पंचाईत येऊन पडली. शेवटी खेरीस ब्राह्मण स्त्रियांचा पुनर्विवाह अगदीच बंद केला