पान:Samagra Phule.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महात्मा फुले : समग्र वाङ्मय ३२ सोडवविल आणि खरा व जिवंत तोच देव मी आहे, हे त्यास ओळखावयास लावून, तो आपल्या आज्ञेप्रमाणे वागणारें करील, परंतु तुम्ही असे म्हणतां की आम्हां ब्राह्मणास मात्र वंदावे. तर मग त्यांनी ईश्वरास काय वंदावे किंवा कसे? जोशी : ब्राह्मणांस वंदिले म्हणजे त्यांत सर्व आले. विदूषक : (सर्व लोकांकडे हात करून) ज्ञानोदयाचे करते (कर्ते) नेहमी ब्राह्मणाचें वंदन करीत. त्यांनी आतां या अज्ञान कुणब्या माळ्यांच्या व मांगामहाराच्या वंदनाची आशा करू नये अशी माझी सर्व जोशांस सुचना आहे. व पुढे जोशी कुणब्या माळ्यांच्या लग्नांत कसकसा घोटाळा घालीत असतात त्यावेळी लग्नाची सुपारी मला आल्यास मीही तेथे येऊन मला काही असे सुचल्यास ब्राह्मणाच्या तोंडावर बोलण्यास कधी कमी करणार नाही. (असे म्हणून सर्व लोकांस सलाम आलकी (आलेकुम) करून विदूषक चालता झाला.) पाद्री : (कुणब्याकडे तोंड करून) बाबा जेथे देवाची ब्राम्हण बरोबरी करू लागले तेथे त्यांची समज समाधानी करावी अशी माझी मोठी इच्छा होती. परंतु आतां संध्याकाळ झाली म्हणून मी जातो, परंतु तुम्हाला जर कधी आणखी वेळ सापडेल तर माझ्या बंगल्यात या. म्हणजे मीच यांनी तुम्हास आपण तुमचे ईश्वर होऊन कसेकसे फसावित आले त्याविषयी सर्व समजूत काढीन. ते कृत्रिमी आणि लबाड आहेत असे मला त्यांच्याच बोलण्यावरून आताच दिसून आले. (असे म्हणून पाद्री टोपी डोचक्यावर ठेवून चालता झाला). (इतक्यात कुणब्याने आपल्या स्त्रीस मोठ्या घाईने) : मी दुकानी आपल्या जोशाचा हिशोब करण्यासाठी आपल्या दुकानापर्यंत जातो व तूं घरी जाऊन लौकर भाजी भाकरी तयार कर. मघाशी तिसरे प्रहरी माझे पोट कांही भरले नाही. (इतके बोलणे झाल्यावर सर्व निघून जातात. थोड्या वेळाने कुणबी आपल्या घरी जातो.) बाईचा नवरा : अगे भटजीचा हिशोब आटोपून आलो. तुझी भाकरी तयार झाली कां? बाई : होय, (वाढलेले ताट नवऱ्यासमोर ठेवून) हे घ्या आणि करा जेवण ! बाईचा नवरा : अगे तुझेही ताट घे. आज आपण बरोबरच जेवण करूं ! बाई : अगोदर तुम्ही आपले आटोपा. बाईचा नवरा : अगे आज तू देखील लवकर जेवण आटोप कशी ! मघाशी त्या परोपकारी पाद्री साहेबाच्या उपदेशावरून व आज घडलेल्या सर्व गोष्टीवरून देवाच्या व धर्माच्या नावांवर आपणासारख्या इतर अज्ञान माळी कुणबी इत्यादी शूद्र जातींनी लबाड्या व हूल थापा देऊन लुबाडून खाण्याचा भटाब्राह्मणांचा कावा चांगला उघड झाला असून शिवाय विद्या शिकण्याचे महत्त्वही आज आपणास चांगले कळून आले आहे. म्हणून आपण लौकर जेवण आटोपून आपल्या घरापलीकडील त्या रा. रा. जोतीराव गोंविदराव फुले