पान:Samagra Phule.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तृतीय रत्न ३३ यांच्या वाड्यात त्यांची स्त्री सौ. सावित्रीबाई फुले यांनी उपवर स्त्रियांसाठी रात्रीची जी शाळा घातलेली आहे त्या शाळेत तू आजपासून जावें व तेथे रा. रा. जोतीराव फुले यांनी वयस्कर पुरुषांकरिता रात्रीची जी दुसरी शाळा घातलेली आहे तीत आजपासून मी जाणे सुरू करितो. या दोन्ही शाळांतून ते दोघे उभयता सर्वांना मोफत शिक्षण देतात. यापूर्वी यांच्या या शाळांत येण्याबद्दल त्या दोघांनी आपणास पुष्कळ वेळा आग्रह केला असता आपण गेलो नाही ही आपण मोठीच चूक केली आहे. बाई : (जेवावयास बसून) ठीक आहे. चला तर आपण दोघे आजपासून रोज रात्री फुल्यांच्या शाळेत जाऊन लिहिणे, वाचणे शिकू. म्हणजेच पुढे जगातील सर्व गोष्टी आपणांस कळू लागतील. (नंतर बाई व तिचा नवरा असे दोघेही जेवण आटोपून आणि आपापल्या हातात पाटी लेखणी घेऊन फुले यांच्या प्रौढ स्त्री पुरुषांत साक्षरता प्रसारासाठी काढलेल्या रात्रीच्या शाळांत शिक्षण घेण्यास तिकडे निघून जातात) - समाप्त- एच-२२ ६