पान:Samagra Phule.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तृतीय रत्न ३१ बाईचा नवरा : साहेब तुम्ही ऐकले ना? हे मी जे बोललो ते लबाड आहे काय? पाहिजे असल्यास चला सर्व आपण गावोगाव जाऊन त्या त्या गावच्या ब्राह्मणांस नकळत विचारून पाहूं. मग कळेल की जोशी बुवा लबाड कां मी? व दुसरे अशें की, येव्हडा वेळ यांचा मनु नाचत होता, आणि आतां तर बोलण्यांत कली का फली घेऊन आलेत ! आतां जर मी विचार करून, बोलू लागल्यास यांच्या मनु सारखी ही कलीची खोड माझ्याने काढवणार नाही ? परंतु पुन्हा कधी फावल्यास पुढे याविषयी बोलून यांची खात्री मीच करीन. कारण आतां मला यांचे सर्व विचारांती खोटें दिसून येऊ लागले. जोशी : अरे तुला लबाड कोण म्हणाला? मी आमचे ब्राह्मण लोक लबाड आहेत म्हणून म्हणालों; परंतु बाबा असं तुम्ही बोलूं नये, साहेब किती दिवस येथे राहणार! शेवटी तुम्हां आम्हांशीच गाठ आहे. कारण मुसलमानाप्रमाणे हे इंग्रजी राज्य आज नाहीतर पुढे काही वर्षांनी जाऊन पुन्हा पेशवाई येईल. अरे ब्राह्मण हे पूर्वीपासून १८ वर्णाचे गुरू असल्यामुळे तुम्ही शूद्रांनी आम्हांस वंदावे यातच तुम्हास ईश्वर प्राप्ती आहे. विदूषक : (सर्व लोकांकडे हात करून) ब्राह्मणाने इतर शूद्र अति शूद्र जातींवर केलेली विद्या बंदी उठवून त्यांना शिकवून शहाणे करण्याकरिता ईश्वराने या देशावर इंग्रजांना पाठविले आहे. शूद्रादी अति शूद्र शिकून शहाणे झाल्यावर ते इंग्रजांचे उपकार विसरणार नाहीत व मग पेशवाईपेक्षा शंभर पटीने इंग्रजी राज्य पसंत करतील. पण पुढे जर मोंगलाप्रमाणे इंग्रज लोक या देशातील प्रजेला छळतील तर विद्या शिकून शहाणे झालेले शूद्र अति शूद्र लोक पूर्वी शूद्रात झालेल्या जहाँमर्द शिवाजीप्रमाणे आपले शुद्रादी अति शूद्रांचे राज्य स्थापन अमेरीकेतील लोकांप्रमाणे आपला राज्यकारभार आपण पाहतील, पण भटांची ती दृष्टी व नष्ट पेशवाई आता पुढे या देशावर कधीच येणार नाही. हे या जोशीबुवांनी पक्के ध्यानात ठेवावे. आणि तसेंच जी ईश्वरप्राप्ती भटांना झाली नाही ती ते तुम्हा शूद्रास कोटून करून देतील? बाईचा नवरा : अहो भटजी, या इंग्रजी राज्यापुढे आतां तुमची ती जुलमी पेशवाई कधीच टिकाव धरून पुन्हा येणार नाही. त्या पेशवाईत शुद्रावर व त्यातूनही अतिशूद्र जे मांग-महार यांचेवर जो जुलूम झाला त्याची आता आठवण होणे देखील नको, या इंग्रजी राज्यांत आमच्या लोकांनी विद्या शिकल्यावर त्यांना चांगले कळू लागेल व मग पुढे ते तुमच्या भटाब्राह्मणांचे काही एक चालू देणार नाहीत पाद्री : पाटलांनी काही खोटे सांगितले नाही. त्यांना आता देवाच्या दयेने जे सत्य ते कळलें व त्यांनी कोणास न दबता ते मात्र तोंडाने बोलून दाखविले. सहजगत्या त्यांच्या तोंडातून निघालेले सत्य बोल ऐकल्यावरून असें अनुमान करवंतें की ईश्वर काही दिवसाने प्रथम शूद्रातिशूद्रांनां विद्यावंत करून तुम्हा ब्राह्मणांनी बनवलेली शास्त्रे लबाड टरबविल. व तुमच्या सांगण्यावरून दगडी मूर्तीला फसून आज जसें भजतात, ते सर्व मूर्तीला भजणे