पान:Samagra Phule.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३० महात्मा फुले : समग्र वाङ्मय आहेत ते सर्व तपकिरीच्या पुड्या बांधण्यास विकून त्यांच्या कवड्या करून आंधळ्या पांगळ्यांच्या धर्मशाळेत पाठवून द्याव्यात. विदूषक : (आपल्याच मनाशी) मला तर असे वाटते की, तपकिरीच्या पुड्याच्या उपयोगी पडल्यास पुढे त्या पुड्या सोडल्यावर त्यातील एखादा श्लोक कोणाचे दृष्टी पडून, सहज त्या तुकड्यावरील श्लोक कोणी वाचील की नाही? म्हणून दुसरी एखादी योजना करावी, म्हणजे कुणब्या माळ्यांचे कल्याण होऊन ब्राह्मणही चांगल्या मार्गास लागतील. जोशी : बरें बरें जर, तुम्हाला शाळेत घालून विद्या आल्याने आमचा अधिकार जातो तर मग पंतोजीने तुजला मारीतो पर्यंत तरी तुझ्या बापाने तुला शाळेत कसा पाठविला? नवरा : हे काय तुम्हाला ठाऊक नाही? जेव्हा शाळेवरील सुपरिटेण्डेंट अथवा कोणी मोटा साहेब येऊन सर्व जातीतील मुले शाळेत घेतलीच पाहिजे म्हणून ताकीद देत असल्यामुळे भट कुलकर्णी सरकारास दाखवायासाठी मात्र कुणब्यांची मुलांची भरती मेंढरासारखी करून साहेबाची स्वारी येईतोपर्यंत शाळेत कोंडून ठेवीत असतात काय व दुसरे असे की तुमच्याबरोबर आमच्यातला एक तरी या वेळेस लिहिणे शिकून हुशार झाला काय? झाला असल्यास चला माझ्या लहानपणीच्या गावात आणि दाखवा ! जोशी : मग हे साहेबास कसें ठाऊक नाही? बाईचा नवरा : त्यांना कसे ठाऊक होईल आणि त्यांना कोण सांगेल? असा कोणाला मगदूर होता? जोशी : तुमचे वडील नव्हते का? बाईचा नवरा : आमचे वडील होते खरे, पण जेथे पाटलास तरी कुळकरण्याच्या व ब्राह्मणाच्या चुक्या सांगाव्या म्हणून धैर्य होत असते काय (नंतर खालचा ओठ दातात धरून मनातल्या मनात म्हणून असे कधी भगवान करील की आमचे सर्व लोक तुम्हा ब्राह्मणांच्या चुक्या बेधडक तुमचे भय न धरता सरकार जवळ सांगू लागतील ?) विदूषक : (कुणब्याकडे तोंड करून) बाबा घाबरा होऊ नको, तुम्ही सर्व माळ्या कुणब्यांनी पण महार मांगांनी सुद्धा ब्राह्मणाचे किमपी भय धरू नये म्हणून ईश्वराने तुमच्या देशात इंग्रजास आणले आहे. व तोच तुमच्यावरील सर्व संकटे जोशी : तुजकडे काहीं बोल नाही हे कलीचेच महात्म म्हणून तुम्ही आम्हा ब्राह्मणाच्या लबाड्या बाहेर पाडू लागलात, विदूषक : (सर्व लोकांकडे हात करून) या राज्यात विद्येचे द्वार सर्व जातींना खुल्ले असतानाही यांच्या लबाड्या बाहेर कलियुगांत सुद्धां पडूं नयेत असे यांना वाटते. दूर करवतील.