पान:Samagra Phule.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तृतीय रत्न २९ जोशी : कुणब्याची जात वेडी खरी ! (असें म्हणून तसाच दात ओठ खात उभा राहिला), विदूषक : कुणब्याची जात वेडी खरी, म्हणूनच त्यांनी ब्राह्मणांचे इतके दिवस अंधासारखे ऐकले बाबा ! (जोशी काही पुढे बोलती इतक्यात), पाद्री : चुप चुप. ब्राह्मणाच्या बुवा गडबड करूं नको, पाटील बुवाला ब्राह्मणाच्या मुलाचे कारण सांगू द्या, (म्हणून कुणब्याच्या डोक्यावर मोठ्या विनोदाने हातातल्या काठीचा शेंडा ठेऊन) बोला बाबा बोला ! ! भिऊ नका ! बाईचा नवरा : (मोठा अटकळत अटकळत) साहेब ती मुले त्याच्या जातवाल्याची होती यावरून आम्हां इतके त्यांना मारीत नव्हते व दुसरे असे की त्यातील एकादा मुलगा शाळा सोडून घरी राहिल्यास त्या गावांतील सर्व ब्राह्मण बायकासुद्धा त्या शाळेत जाण्याविषयी इतका घेघाट करीत की त्याला अन्नपाणीसुद्धा गोड लागू देत नसत. पाद्री : बरे तर तुम्हा कुणब्या माळ्यातील एकादा मुलगा घरी शाळा सोडून राहिल्यास तुमचे आईबाप कोठे जात असत? त्यांनी तुम्हाला उपदेश करूं नये का? जोशी : वाहवा साहेब वाहवा ! आतां फारच उत्तम विचारले. म्हणून कुणब्याकडे तोंड करून म्हणतो आतां हो पाद्री, नाही तर तुमच्या वडिलांनी तुम्हांला शाळेत पुन्हा जा म्हणून का सांगत गेले नाही याचे कारण सांगा. बाईचा नवरा : जोशी बुवा तुम्हाला राग तर येणार नाही? जोशी : बोल बोल. आमचा राग चुलीत गेला, आता का आमची पेशवाई आहे म्हणून तुला शिक्षा करविण्याविषयी आमच्याने खटपट होणार? व आता तुम्ही आपल्या मनुच्या कायद्याला मानताल कां ? पहा पाहिजे असल्यास मनुसं हिता ।। अ. (कायदा)" ।। श्लोक (कलम) २०५ ।। विदूषक : (सर्व लोकांकडे हात करून म्हणाला) मनुनें कायदे कुणब्या माळ्यांच्या अनुमताने केले असतील काय? बाईचा नवरा : तुम्ही ब्राह्मण लोक आमच्या आई-बापांना असें नेहमी सांगत नसतां की, अरे तुम्हाला लिहिणे शिकण्याचा तो कोण तुमचा मनु का फनूच्याच कायद्यावरून अधिकार नाही, मग त्यांनी करावे काय? त्यांनी का तुमच्या मनुच्या कायद्याला हरताळ लावून आपापली मुले शाळेत घालतील की काय? कारण तुम्ही त्याला लिहिण्याचे तोंडच दाखविले नाही म्हणून, ते तुमचे आंधळ्यासारखे ऐकत होते. परंतु आता या हिंदुस्थानांत इंग्रज सरकारच्या कृपेने असे असे आमचे कांहीं एक माळी कुणबी (व ईश्वर करील तर महार मांगही होतील) आहेत की ते तुमच्या मनुका फनुच्या कायद्याला हरताळ कोण लावीत बसतो म्हणून जे असे एकदम सिद्ध करून दाखवतील की मनुचें म्हणून जे काही कायदे