Jump to content

पान:Samagra Phule.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२६

महात्मा फुले : समग्र वाङ्मय

आतां तुम्ही असे म्हणाल की कुणबी माळी सर्व अडाणी आहेत; त्यांला कशाची लिहिण्याची गोडी; म्हणून त्यांनी आपली मुले घरी ठेऊन घेतली असतील. पानी होय, (ब्राह्मण लोकांच्या सांगण्यावरून) माझे मत तसेंच आहे.
बाईचा नवरा: साहेब ! जेव्हां मामलेदार वगैरे ब्राह्मण कामगाराचा तुम्हा इंग्रज लोकासारखा विद्या शिकल्यामुळे डामडौल बाढून, मोठ्या इतमामास पावलेल्या गृहस्थास दृष्टीने आम्हीं पाहतो. तेव्हां को आमच्या मनांत लिहिणें शिकू नये म्हणून येत असेल काय ? नाहीं नाहीं ! नेहमी आमच्या मनांत असें येत असतें की, आपणही विद्वान होऊन महालकरी तरी व्हावे, परंतु आपल्या या ब्राह्मण पंतोजीची कारस्थाने तुम्हांला काय ठावी?
विदूषक : साहेब, कुणबी आता काय बोलला, त्यावर तुम्ही पाद्रींनी पण विचार करावा बरे.
पाद्री: तुम्ही म्हणता ते सर्व खरे आहे, पण आतां तसें कांही नाही; कारण आताशी कृपाळू क्योडी साहेबांनी बरेच दुसरे नवें पंतोजी तयार करून गावोगांव पाठविण्याचा झपाटा चालविला आहे.
बाईचा नवरा: साहेब तुम्ही आपलीच टर शेवटास नेता असे मला वाटतें, अहो आपल्या क्यांडी साहेबांनी हत्ती एव्हढाले पंतोजी तयार करून, गांवोगांव शिकण्याकरितां पाठविले, हे मलाही ऐकून (माहिती) आहे. पण फळ काय ? त्या गावांतील सर्व ब्राह्मण लोक कुणब्या माळ्यांनी आपली मुले शाळेत पाठवू नयेत, म्हणून आतल्या आंत त्यांना उपदेश करून, अथवा कुलकर्णीपणाचा धाक दाखवून त्यांच्या मुलांच्या शिकण्याच्या आड येत नसतील काय !
पाद्री :छ: छः पाटीलबुवा. हें केवळ तुम्ही द्वेष बुद्धीनें बोलता. कारण आतांशी सर्व ब्राह्मण लोक आमच्या तोंडावर, तुम्ही बाकीच्या सर्व लोकांनी विद्या शिकावी म्हणून बोलत असतात. विदूषकः पाद्री साहेब, तुम्ही थोडे दिवस कळ काढा म्हणजे सर्व कुणब्या माळ्यांची एकदम अशीच त्यांच्या गाहाणाची आरोळी सरकारच्या कदमापाशी येईल; कारण आतांशी त्याला थोडे कळू लागले आहे, तथापी ब्राह्मणास अद्याप आतल्या आंत भीतच आहेत. बाईचा नवरा: बरे, जर सर्व ब्राह्मण आमच्या शिकण्याविषयी 'तोंड देखली" काळजी वाहतात आणि त्या बोलण्याप्रमाणे साहेब लोकांच्या मागें गांवोगाव जाऊन, तशी वर्तणूक करितात अशी तुमची पक्की खात्री आहे काय ?
विदूषक का! पानी साहेब तुम्ही इंग्रजांनी आपली विद्या शिकवली तरी बहुतेक इंग्रजी तुमच्या हाताखाली शिकलेले ब्राह्मण कांहीतरी भेद असलाच पाहिजे, " म्हणून बोलत नसतात काय ?
पाद्री: आता ते आम्हांशी बोलून दाखवितात एक; आणि तुम्हाशीं वहिवाट करतात दुसरी, याला आम्ही काय करावें ?