पान:Samagra Phule.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मला वाटू तृतीय रत्न २५ बाईचा नवरा : भाई साहेब तुम्हीं कांही आमच्या मधी बोलू नका; साहेबाला माझ्याबरोबर थोडे बोलू द्या कारण तुम्ही म्हणता ते व साहेबांचे बोलणे सर्व खरे असावे असे आता लागले. मुसलमान : पाद्री साहेब पटेल की तुम्हारेसे बात करनेकी बहीत खुशी है. चलने देव में भी खडेखडे सुनता हूँ, पाद्री : त्यांनी कशाचे तुम्हांला मारुतीच्या नावांवर फसविले. कारण तेही तुमच्या बाकीच्या लोकांसारखे अद्याप अडाणीच आहेत व त्यांचे पूर्वज जसजसे तुमच्या पूर्वजांशी वर्तत होते तसतसें तेही तुम्हाशी बर्ततात, म्हणून त्याजकडे (हल्लीच्या ब्राह्मणाच्या बोलण्यावरून.) यांचा काही बोल नाही. बाईचा नवरा : असें बोलू लागल्यास त्यांच्या तोंडाला साहेब कोण हात लावील? कारण त्याचे मत असें आहे की, बापाने मिळवलेला इनाम मुलाने स्वस्थ खावा; पण याची सरकारपट्टी मात्र मुलांनी देऊ नये; म्हणजे त्यांनी आपल्या पूर्वजाप्रमाणे आमच्या श्रमाच्या पोळ्या खुशाल खाव्यात, परंतु त्या पोळ्याचा दाम खर्च आम्हा माळ्या कुणब्यास भरून घेणे आवडल्यास मात्र, आम्ही त्याच्या पूर्वजाचा शोध करीत फिरावें काय? काय मीज आहे! !! विदूषक : हाताचे सोडून पळत्याच्या पाठी कोणी लागाये या! पाद्री : पाटील इतके रागावू नका थोडे शांत व्हा; आणि मजशी किंचित बोला तुम्हाला वाचतां येते काय ? (तिकडे सर्व ब्राह्मण आशीर्वाद देताना एकमेकांकडे डोळ्याने चमकाऊ लागले.) बाईचा नवरा : साहेब मला राग येऊन फळ काय? माझ्याने काय त्या भटांचे होणार? परंतु मला वाचता येत नाही. पाद्री : कां! तुम्हाला वाचता कां येत नाही ? बाईचा नवरा : साहेब मी जेव्हा लहान होतो, तेव्हां माझा बाप एका खेड्यांत रहात असे, त्यावेळी त्याने मला शाळेत शिकण्याकरितां घातले होते खरे, परंतु शाळेत पंतोजी मला फार मारूं लागला म्हणून माझ्या आईने मजला शाळेतून काढून गुरामागे लावले. विदूषक : (सरकारकडे तोंड फिरऊन म्हणाला) कुणबी काय जे आतां बोलला ते सर्व सत्य आहे. तसे होत असते बरें! पाद्री : तुम्हालाच पंतोजी इतके कां मारी ? इतर सर्व मुलास मारीत नसे? तुम्ही काही खोडकर असाल. बाईचा नवरा : कदाचित, मी एक खोडकर असेन, पण सर्व कुणब्या माळ्यांची मुले मजसारखींच होती काय? तेथे तर सर्व कुणब्यांनी आपली मुलें घरी ठेवून घेतली होती.