पान:Samagra Phule.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४ महात्मा फुले : समग्र वाङ्मय याच्या नावांवर फसून, कर्जबाजारी होणार नाहीत; व दुसरे असे की त्या सोंगाला फोडल्याशिवाय खरा जो भगवान आहे, त्याला आम्हातील सर्व लोक तोपर्यंत ओळखू शकणारच नाहींत. विदूषक: आतां पाद्री आणि ब्राह्मण दोघांच्या उपदेशांत किती अंतर आहे या विषयी विचार करणे तुम्हा सर्व लोकांकडे सोपतो. पाद्री : ( मोठा भययीत होऊन म्हणाला) पाटीलबुवा याला आतां या वेळेस फोडूं नका, कारण तुम्हासारख्या समजुतीचे लोक फारच थोडे आहेत. म्हणून बाकीचे सर्व अज्ञानी तुम्हांवर फिर्याद करून, तुम्हास सरकारांत पकडून नेतील; व सरकारही तुम्हाला आरोपी ठरवून शिक्षा करतील. विदूषक : पाद्री साहेब तुम्ही इतके का भिता? हे कुणबी माळी कसचे मारुतीला फोडतात? अहो हा घरी गेला म्हणजे याला भलता कोणी एकदा ब्राह्मण येऊन नेहमी प्रमाणे असे सांगेल की, अरे पाद्रीचा धर्म खोटा आहे म्हणजे झाले. हाही ब्राह्मणाचा उपदेश ऐकून त्या सारखा तुमची व तुमच्या धर्माची निंदा करू लागेल; याला ते धर्माविषयी विचार करण्यास उमास तरी खाऊ देतात; एकतर हे विचारशून्य, दुसरे शूद्रांनी ब्राह्मणांची आज्ञा कधीच उन्नधू नये, म्हणून बहुत दिवसांपासून, ब्राह्मणांनी आपल्या लेखणीच्या व सत्तेच्या दिमाखाने कुणव्या माळ्यांच्या मनांत ठसविले आहे. हे सर्व खोटे वाटत असल्यास, मनुकडे य परशूरामाकडे पहा म्हणजे तुमची खात्री होईल. बाईचा नवरा : साहेब तुम्हाला काय सांगू! या बेट्या मारुतीच्या नावावर या ओरडणाऱ्या ब्राह्मणांनी मला इतके फसवून बुडविले आहे, की जर मी तुम्हास सर्व मुळापासून सांगेन तर तुम्ही पण माझी नातवानी पाहून, या ब्राह्मणास सुद्धा काही शिक्षा असावी म्हणून म्हणाल, मग माझतीला फोडणं तर कोणीकडेसच राहील. (इतक्यात एक मुसलमान हे सर्व बोलणे ऐकत उभा होता त्याने पुढे हात करून म्हणाला-क्यऊं पाद्री साहेब पिच्छले दिनोमे हमारे बादशहाथीने हिंदूक बड मुतोकू फोड डालेसो अच्छा किया; ये सब लोग उन्होंके नामसे ताने मार-मारकर रोते है ये बडा आबसोस [अफसोस] है.) पाद्री : दुमक माआलुम नही मेरे साहाय टुमारे बादशहावोंने इन्होंके बुंतोंकू फोड डाले, सो अच्छा किया यह सच है, लेकीन उन्होंने हमारे मूजब तकरीर करकरके उन्होंके हातोसें फोडा नहीं. बाईचा नवरा : साहेब, ते भाई काय म्हणतात? पाद्री ते असे म्हणतात की तुमची सोरटी सोमनाथची मूर्ती त्यांच्या एक बादशहाने फोडली, हे त्या बादशहाने फार चांगले केलें, म्हणून मी त्यास असे उत्तर दिले की तुम्ही आम्हासारखी केवळ हिंदुची समजूत करून, ती मूर्ती फोडविली नाही; याकरिता, सर्व हिंदू तुमच्या बादशहाच्या नावाने अद्याप कुरकुर करीत आहेत.