पान:Samagra Phule.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तृतीय रल २३ कांही कुरकुर केल्याशिवाय सहन करीत आली यावरून पृथ्वी धोंड्याची आई आहे म्हणण्यास काही चिंता नाही. पाद्री : बरे तर, आतां ती पृथ्वी कशी आपल्या आपण उत्पन्न झाली, किंवा दुसरे कोणी उत्पन्न केली असावी? बाईचा नवरा : (कांहीसे डोळे झांकून, किंचित खाली मान करून, आपल्या मनाची नजर विस्तीर्ण जगाकडे पोहचवून माटा उसासा टाकून) साहेब तिचा कोणी तरी दुसरा उत्पन्न करणारा असावा असं मला वाटते. पाद्री : शाबास रे! बाबा शाबास (म्हणून वरती तोंड करून, मोठ्या करुण स्वराने असे म्हणाला की हे आमच्या आकाशातील बापा, तू आम्हा सर्व जगास उत्पन्न केले आहेस; म्हणून तुझी शक्ती व लीला अपार असून तूं धन्य आहेस; यावरून, तुझीच सेवा आम्ही सर्वांनी निष्टेने करावी; भगवान तू आताशी कृपाळू होऊन, माळी, कुणबी लोकांच्या दृष्टी पडूं लागला म्हणून त्यांचा उदयकाळ जवळ आणू पाहतोस नंतर खाली कुणब्याकडे तोंड करून म्हणाला) पाटीलबुवा आतां आपण पृथ्वीची किंवा तिच्या उत्पन्न करणाऱ्याची पूजा करावी हे मला सांगाल तर फारच बरे होईल. बाईचा नवरा : त्याचीच! त्याचीच मनाने पूजा करावी; कारण तो दृष्टी अगोचर आहे; असे मला आतां विचारांती उघड दिसून, भास झाला. विदूषक : पाद्री साहेब, तुम्ही आपला उपदेश करण्याचे चालू द्याच; रुमालाने तोंड पुसण्याच्या गडबडीत पडू नका; नाही तर ते बडबड करणारे ब्राह्मण कदाचित याचे जवळ दाखल झाल्यास, ते या कुणब्याच्या मनात भलत्याच विचाराची लहर घालून त्या लहरीच्या झोकानें या अज्ञान्याला सुद्धा तुमचा द्वेष करावयाला लावतील; कधी कमी करणार नाहीत; याविषयी अनुभव तुम्हाला असेलच! मीच या विषयी तुम्हाला सांगावे असें नाही. पाद्री : पाटीलबुवा तुमचा विचार तसाच तुमच्या मनांत आहे ना? मला थोडेसे दुसरे काही विचारावयाचे आहे. विचारा म्हणाल तर विचारतो. बाईचा नवरा : साहेब आतां तुम्हाला जे पाहिजेल ते विचारा; पण आपल्या जगकर्त्या भगवंताविषयी मात्र विचारा, कारण आता मला त्या वेळेस त्याच्या गोष्टीशिवाय दुसरें कांही आवडत नाही. पाद्री : ( मारुतीकडे बोट करून) पाटील वुवा तो हाच देव की काय? आणि तो दृष्टी अगोचर आहे म्हणून त्याच्या ठिकाणी याचीच मनाने पुजा करावी की काय? बाईचा नवरा : ( पंचमुख्या मारूतीकडे पाहून. मोट्या रागाने पावून म्हणाला) साहेब तुम्हाला नाव साजे, माझी खात्री होऊन मला तर असे कळून आले की हा धोंडा पुजण्यास तर पात्र नाहींच; पण याला आता फोडून, याच्या चिंधड्या चिंधड्या करून, मातीस मिळवून याची राख रांगोळी केली, म्हणजे दुसरे कोणी मजसारखे भोळे गृहस्थ ब्राह्मणाचे ऐकून