पान:Samagra Phule.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महात्मा फुले

समग्र वाङ्मय

पाद्री : (मोठा अचंबा पावून म्हणाला) आम्ही देवरहित म्हणजे! हे बाबा मला कसें ते सांग. बाईचा नवरा : काय तुमच्या मम्मा देवीच्या देवळांत कसल्यातरी देवीची मूर्ति आहे का? पहा आमचा देव कसा दृष्टीने सुद्धा पहाता येतो; (म्हणून पंचमुख्या मारुतीकडे बोट करून दाखविले.) विदूषक : पहा पाद्रीसाहेब! तुम्हीच पहा. ब्राह्मणांनी कुणब्यास अज्ञानी करून ठेवले आहे की याला देव आणि दगड यामध्ये काय भेद आहे, तो सुद्धा पण कळत नाही. पाद्री : पाटीलबुवा, तुमच्या समजुतीप्रमाणे हा देव आहे खरा, पण मी कांही तुम्हांस देवाविषयी विचारल्यास राग न येतां सांगाल? बाईचा नवरा : वाः! सांगण्यास कोणती हरकत आहे? तुम्ही विचारा मी सांगतो. पाद्री : पाटीलबुवा हा तुमचा मारुती देव कशाचा केला आहे? बाईचा नवरा : यांत कशाचा राग, आमचा मारुती देव दगडाचा केला आहे. पाद्री : बरें बरें, हा दगड कोटून आणला असावा बरें? बाईचा नवरा : खाणीतून आणला असावा असे मला वाटते. पाद्री : बरे पण ज्या खाणीतून हा धोंडा आणला असावा त्या खाणीत हा एव्हढाच धोंडा होता काय? विदूषक : असे काय तुम्हीं वेड्यासारखें विचारतां? आहो, सडकेवर जी खडी करून टाकलेली असते, ती त्याच दगडाची नव्हे ? आणि त्याच खडीची पुन्हा आपल्या सर्वांच्या पायाखाली तुडविल्याने दरवर्षी माती होत नसते? बाईचा नवरा : आता ती खाणच म्हणविली आहे; तीत एकटाच धोंडा होता म्हणून कोणाच्यानं म्हणवेल? तेथे तर एव्हढा मोठा धोंडा आहे की त्या धोंड्यातील हा मारुती केलेला धोडा त्याचा कपरासुद्धा म्हणण्यास मला लाज वाटते. पाद्री : बरं बरं तुमच्या मनांत ज्या धोंड्यातून, हा धोंडा फोडून आणलेला तो धोंडा किती मोठा असावा या विषयी काही तुमच्याने अनुमान करून सांगवेल काय? बाईचा नवरा : साहेब माझी मती तर (कुंठित) झाली; कारण तो धोंडा किती मोठा असावा, हे माझ्याने सांगवत नाही. पाद्री : बरे तर तो धोंडा कोठे असावा, हे तरी तुमच्याने सांगवेल का नाही? बाईचा नवरा : हे मी सांगतो तो धोंडा पृथ्वीत आहे. पाद्री : बरे, तो धोंडा जर पृथ्वीत आहे तर, तो धोंडा पृथ्वीच्या पोटांत आहे; किंवा पृथ्वी त्याच्या पोटांत आहे; हे मला कृपा करून कसे सांगता पाहूं बरे? बाईचा नवरा : धोंडा? धोंडा पृथ्वीच्या पोटांत आहे; हे उघड पांच वर्षांचे मूलसुद्धा सांगू शकेल! मग मी सांगेन यांत नवल काय? व दुसरे असे की त्या धोंड्याचे वजन ती बापडी 8