पान:Samagra Phule.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तृतीय रत्न १७ बाईचा नवरा : महाराज तुम्ही उतरू लागता का नाही? मी तर आता हे ओझे उभ्याने टाकून देईन, कारण माझ्या डोक्याला याळ आली व माझी मान मोडायला झाली, तुमच्या सोवळ्याला काय म्हणू. विदूषक : ख्रिस्ती शास्त्रांत लिहीले आहे की, तुम्ही ओझ्याने लादलेले आहात ते सर्व तेथे सत्य होत आहे की नाही? जोशाची स्त्री : (मोठ्या जुलामने) अरे उगीच बडबड करू नको मी तुला उतरू लागते पण सांभाळ हो! मजवर सर्व भार टाकू नकोस! बाईचा नवरा : नाही बाईसाहेब, तुम्ही किंचित साहय करून पाटीचा कल मात्र सांभाळा म्हणजे मीच उतरतो. तुम्हाला काही मेहनत पडू देत नाही (असे म्हणून ओझे तर एकदाचे खाली उतरून ठेवले) जोशी : (दुरूनच) बैस बैस थोडा विसावा घे, तुला फार ओझे झाले होते काय? बाईचा नवरा : चाल्लेच आहे महाराज. हा कर्मभोग आहे. देहांत जीव आहे तोपर्यंत भोगला पाहिजे! विदूषक : सत्य, सत्य कुणब्याच्या जन्माला हा ब्राह्मण ग्रहाचा भोग लागला आहे. जोशी : बरे तर तुझा एकादा ओळखीचा ब्राह्मण उद्या आमचे घरी जेवावयास बोलवावयाचा आहे काय? बाईचा नवरा : (मोठा आनंदी होऊन उत्तर देतो) (इतक्यात जोशाच्या स्त्रीने यांच्या बोलण्यात तोंड मधे घालून, जोशास अशी म्हणाली, तुम्हाला वेड तर लागले नाही?) जोशी : वेड म्हणजे, तू मला असे का म्हणालीस? स्त्री : अहो तुम्ही जर त्याच्या ओळखीच्या ब्राह्मणांस जेवावयास बोलाव म्हणालात तर हे ब्राह्मणभोजन आहे किंवा मेजवानी हे मला अगोदर सांगा कसे? जोशी : (भली इने आपल्या भावाविषयी रिकामी जागा केली असे मनात समजून म्हणाला). वाहवा तुला बरे अशा प्रसंगी हे सुचले. विदूषक : पहा येथे जोशीणीने आपल्या भावांकरिता नवऱ्याला समजण्याजोगी लबाडी केली किंवा कसे? बाईचा नवरा : महाराज ताईने तर तुम्हाला हाटिवले, आता मी पण तुमच्या येथे जेवणार नाही. जोशी : नाही बावा असे कसे म्हणतोस, कांही अन्न ब्राह्मणास पुरून, उरल्यास तुला प्रसाद द्यावा लागल. एच २२ ५