पान:Samagra Phule.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८ महात्मा फुले : समग्र वाङ्मय विदूषक : ब्राह्मणास तूपपोळ्यांची रेलचेल, आणि ज्याचा माल त्याला उरल्यास प्रसादा दाखल. वाः जोशाने येथे खूब.. केली. बाईचा नवरा : बरे महाराज, तुमच्या मर्जीप्रमाण का होईना. जोशी : आत तू जा आणि सर्पणासुद्धा दोनतीन काय ज्या खेपा होतील, त्या सर्व संध्याकाळपर्यंत येथे वाहून आण; आणि मी आता जेवलो म्हणजे भवानी पेठेत जाऊन ब्राह्मणांस सांगून टाकतो, नाहीतर ते एकादे दुसरे आमंत्रण घेतील. बाईचा नवरा : बरे तर जलदी करा महाराज (असे म्हणून, हारा डोचकीवर पालथा टाकून रस्त्याने चालता झाला. इतक्यात जोशाची स्वारी, हातात मुकट्याचा घोळ धरून, मोठी घाबऱ्याने बाहेर धावत कुणब्याच्या पाठीशी जाऊन थबकली). जोशी : अरे बाबा तू असे कर, जेव्हां तू दुसरे ओझे घेऊन येशील, तेव्हा बाकीचे राहिलेले सर्व रुपये तुझ्याबरोबर सांभाळून घेऊन ये म्हणजे मी आजच जप करणाऱ्या ब्राह्मणास धोतर जोडा विकत घेऊन येईन. उद्या बनते ना बनते, परंतु मागेच दामू मजजवळ असे बोलला होता की मजजवळ रुपये द्या म्हणजे मी आपल्या खात्रीचा धोतर जोडा माझा मीच विकत आणून घेईन. म्हणून त्यास विचारून, तो पाहिजे असल्यास रुपये घेवो अथवा धोतर जोडा घेवो, आपल्याकडून हरकत नसावी म्हणजे झाले. कारण त्याने दोनतीन वेळा मजकडे रुपयांची मागणी केली. विदूषक : दामूने मागणी केली असे जोशी म्हणाला या बोलण्यास कोणी सत्य म्हणेल काय? बाईचा नवरा : बरे. (म्हणून पुढे चालता होऊन जोशाची स्त्री : (जोशास भोजन घालते वेळी) कायहो मी त्या कुणब्याच्या ओळखीचा ब्राह्मण त्याने बोलावू नये म्हणून कशी युक्ती केली? विदूषक : जोशीणीच्या युक्तीला याप्रसंगी कृत्रिम म्हटल्यास काही हरकत आहे काय ? जोशी : वाः भलीच युक्ती केलीस; कारण तुम्ही बायका कोणाच्या? ब्राह्मण जन्म पावून अशी युक्ती केली नाही तर मग काय व्यर्थ जन्म म्हटल्यास काय चिंता आहे. जोशाची स्त्री : कांहो, तुम्ही भवानी पेठेत केव्हां जाल, हे मला कृपा करून सांगा. कारण फार दिवस झाले माझी आई मला भेटली नाही म्हणून तिला असे तुम्ही सांगा की, उद्या तरी मला कसेही करून भेट, परंतु तुम्ही जेवून उठताच जलदी जर जाल तर ती भेटेल नाहीतर कदाचित ती पुराण ऐकण्यास जाईल. जोशी : बरे मी जेवतांच जाईन खरा; पण तो धोतरजोड्याच्या निमित्ताने तरी, रुपये घेऊन येईतोपर्यंत तरी मला थांबले पाहिजे का नको? कारण तो मला फार वडवाईट दिसतो. आपले कांही कर्ज नाही म्हणून त्यावर तगादा पाठवू ?