पान:Samagra Phule.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६ महात्मा फुले : समग्र वाङ्मय (इकडे जोशाच्या सांगण्याप्रमाणे जोगाई आणि तिचा नवरा सामानसुमान जोशांचे घरी उरापोटावर वाहून नेत असता तिकडे जोशाचे आणि त्याच्या पत्नीचे संभाषण झाले; त्यापैकी काही येथे थोडेसे लिहितो) जोशी : अगे तुला काही माहीत आहे काय? स्त्री : काय ते? तुम्ही कळविल्याशिवाय मला माहीत कसे होईल? जोशी : अगे आपल्या जोगाईचा नवरा उदईक तेवीस ब्राह्मण भोजन घालतो आहे. स्त्री : हं हं, तर ब्राह्मण सांगण्याचे काम कोणाकडेस आहे? जोशी ते काम मजकडे, मीच त्यात मुखत्यार आहे. मी ज्याला पाहिजे त्याला सांगू शकेन. स्त्री : तर माझे सख्खे व चुलत भाऊ या सर्वांस तुमच्याने सांगण्याची सई करवेल, व दुसरे असे की तुम्ही त्या कामात कारभारी आहात म्हणून त्यास दक्षिणाही यथासांग देववाल. जोशी : असे. आता या अशा वेळेस जर आपण आपल्या संबंध्यांच्या उपयोगी पडू नये तर केव्हा? मी त्यालाच बोलविणार आहे, परंतु तुला एव्हवी विचारून, तुझे बरे कसे काय मत आहे म्हणून तुला विचारून पाहिले. विदूषक : अशा वेळेसच जोशाने आपल्या संबंध्यांच्या उपयोगी पडावे कारण यालाच लुटीचे गहू आणि बाबाचे श्राद्ध म्हणतात. स्त्री : (मोठा मुरका मारून म्हणाली) काय बाई! पुरुषाची जात? माझे का? मत तुम्हास पाहायचे होते? तुम्हाला का तुमच्या मेहुण्यांची काळजी नसेल काय? विदूषक : बाई जात पुरुषांची खरी, पण ही जात ब्राह्मणांची आहे बरे! तुला ठाऊक नाही, म्हणून तू आपल्यातल्या विधवा स्त्रियास या जातीविषयी विचार म्हणजे ज्या तुला ब्राह्मणाच्या जातीची काय जी खुणगाठ आहे, ती हुबेहुब दाखवितील बरे? (इतक्यात जोगाईचा नवरा पिठाकुटाचे ओझें घेऊन आलेला दरवाज्याशी उभा राहून जोशास उतरू लागा महाराज म्हणून हाक मारून म्हणाला), जोशी : अरे मी आताच सोवळा झालो. दुसऱ्या कोणी रस्त्यावरील मनुष्यास हाक मार म्हणजे तुला उतरू लागेल, नाहीतर कदाचित मी ओवळा होऊन तुला उतरू लागेन. स्त्री : (हळूच डोळे मिचकावून म्हणाली) तुम्हाला वेड तर लागले नाही? कोणी एकदा रस्त्यावरील येणाया जाणान्याला त्याची दया येऊन त्याला उतरू लागतील तर का राहतात? तुम्ही सध्या संध्या करून जेवायास मोकळे तर व्हा. विदूषक : रस्त्यावरील लोकांस कुणब्याची दया यावी आणि त्याच्या श्रमाच्या पोळ्या खाणारी ती बाई, तिला कुणब्याची दया येऊच नये काय?