पान:Samagra Phule.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४ महात्मा फुले : समग्र वाङ्मय बाई : तुमचा दामू भाऊ आल्यास मग बरेच झाले. जोशी : बरें तर आता मी कोणकोणते धान्य व सवदा सूत किती किती आणावें ते तुला सांगतो; याकरिता तुम्ही उभयतांनी शांत होऊन ध्यानात ठेवावे, (असें म्हणून सुमारे चार रुपयांचा खर्च करण्यास सांगून (तूप) मात्र आमचे आणून घेऊ; कारण तुम्हाला तूप कसले घ्यावें हे ज्ञान नाही. नंतर घरी जाऊन दामूस प्रश्न करून, असे म्हणाला, काय रे दामू, तू उद्या जप करण्याचे पत्करतोस का?) दामू : जप कोण करवीत आहे? जोशी : तो एक कुणबी आहे. दामू : किती दिवस करविणार आहे? जोशी: ते सर्व माझ्या हातात आहे! मी जसे सांगेन तसे तो करील बेटा. दामू : तर मग आठ दिवस लागोपाठ जप करण्याची तजवीज कर; म्हणजे माझी धोत्रे फाटली आहेत, म्हणून मी दुसरी नवी धोत्रे घेईन; परंतु तूं त्याजकडून धोत्रे विकत मात्र आणवू नको बरें दादा. कारण तू रुपये देवीव म्हणजे माझी मीच आपल्या खात्रीची आणीन. विदूषक : परंतु दामूच्या मनांतले बैठकीतले तबक साजरे करायचे आहे, हे बेटा कशाची धोत्रे घेतो, हे या जोशास काय ठावे? जोशी : बरें (म्हणून तसाच त्या कुणब्याच्या घरी परत माघारी पुन्हा आला, परंतु बाईने आपला नवरा बाजारात सामान आणण्याकरितां पिटला होता; म्हणून बाई घरी एकटीच होती, याकरिता बाईचा नवरा येई तोपर्यंत जोशाला काही वेळ कळ काढावी लागली. नंतर तो कुणबी आल्यावर.) जोशी : बाबा, एक तजवीज फारच उपयोगी झाली. ती अशी की जपाचे काम आपल्या दामूनेच कबूल केले, व मीही तुझ्या गरिबीविषयी त्याला पुष्कळ सांगितले पण तो असे म्हणतो की आपण सर्व व्यवस्था केलेल्या बहुत सुंदर आहेत खऱ्या: परंतु, एका दिवसाच्या जपाने शनी कांही झेपणार नाही. विदूषक : दामूने जपाचे काम धोतरजोड्यावर जोशाच्या शिफारशींवरून पत्करले, हा मोठा यांनी कुणब्यावर उपकार केला असावा नाही बरे? बाईचा नवरा : तर किती दिवस जप असावा म्हणून त्याचे मत आहे ? जोशी : निदान पक्ष अकरा दिवस तर पाहिजेच, असे माझे पण मत आहे. बाईचा नवरा : माझी काही नको नाही; परंतु या सर्व खटपटीला आहेत तेवढे रुपये पुरतील ना?