पान:Samagra Phule.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१० महात्मा फुले : समग्र वाङ्मय नवरा : विपरित? ते कसे, सांग कळू दे तरी दे बाई : (मोठा मुरका मारल्यासारखे करून म्हणाली) तुम्हांला राग तर येणार नाही. कारण त्यांनी काहींसा खर्च सांगितला आहे. नवरा : असा काय तो खर्च लागणार? बाई : खर्च तर काही नाही, फार थोडा आहे; पण तुम्ही कबूल केला पाहिजे म्हणजे झाले. नवरा : कबूल न करावे तर काय करावे? अगें आपण येव्हडा संसार करितो, याचे मग फळ काय? जर, मुलाच्या उपयोगी नाही तर कशाच्या? विदूषक : कुणबी लोकांत किती हे अज्ञान ! की जोशाचे कृत्रिम न समजतां त्याचा उपदेश यास सत्य उपदेशासारखा वाटतो ना !!! याचे नशीबच फुटके त्याला कोण काय करील? बाई : सांगू, सांगू (असे दोन चार वेळा मान हालवून म्हणाली) आपले जोशीबुवा असें म्हणाले की माझ्या मकरराशीला शनी जो आहे, त्याने आपल्या होणाऱ्या बाळाला पीडा करूं नये, म्हणून आपण मारुतीचे तेवीस ब्राह्मण तूपपोळ्याचे घालावे. नवरा : बरें तर तुझे मत याविषयी कसे काय आहे ? बाई : मी बायकोमाणूस. माझी बुद्धी ती किती? माझें मत तुम्हावर; कारण त्याला खर्च करण्यास पैसा नको? या कां तोंडच्या गप्पा आहेत? नवरा : तू म्हणतीस ते खरे आहे. पण त्यास पैसा तरी किती लागेल? बाई : असे काय तुम्ही मला वेड्यासारखें विचारतां? आपण कधी सणावारास पोळ्या करून खात नसतो काय? नवरा : अगे तुला समजत नाही, आपण केवळ गुळाच्या पाण्याबरोबर पोळ्या खात नसतो काय? आणि त्याला तर भरचक्का गुळवण्यासारखे तूप पोटभर पाहिजे का नको? आतां तूप लागेल, हे तुझ्याने अथवा माझ्याने तरी सांगवेल काय? यावरून कोण तू वेडी का मी? बाई : (मोठी शर्मी होऊन) बरें तर मी जोशीबुवास जाऊन विचारतें. नवरा : तुला त्याचे घर ठाऊक आहे काय? असल्यास मीच त्यास विचारून येतो; तू गरव्हार- सरव्हार, उन्हात कोठे जातीस! (इतक्यात जोशाची स्वारी बाहेर दरवाजाशी येऊन ठेपली, व त्याने बाईस हांक मारताच, बाई आणि तिचा नवरा मोठे हर्ष पाऊन धावतच बाहेर जोशाजवळ आले.) बाई : (किंचत हनुवटी वर करून डोळे वासून म्हणाली) कां बुवा इतके घाबरे का झालात? जोशी : बाई माझी तपकिरीची डबी तुझ्या येथे किंवा कोठे सांडली असावी म्हणून मी तिचा शोध करीत फिरत आलो. त्यास किती