पान:Samagra Phule.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

. तृतीय रत्न ९ घाल म्हणतो, आणि जोशाला तिच्या पोळ्या खा म्हणतो, व दुसरे मला असे वाटते की ब्राह्मणांनी ग्रह उत्पन्न केले आहेत, म्हणून ते आपल्या उत्पन्न करणाऱ्या जोशी बापास पीडा कसे करतील? खरेच ग्रहांनी आपल्या बापाला पीडा करूं नये असे माझेपण मत आहे. परंतु ब्राह्मण ग्रहाचे बाप ठरल्यामुळे त्यांनी इतर लोकांस आपल्या पुत्राप्रमाणे बाई : महाराज, श्रावणमास किती दिवस राहिला आहे? जोशी : आजपासून सोळा दिवसांनी सुरू होईल. बाई : तर मग जवळच आहे, मी आता माझा नवरा घरी आला म्हणजे त्याला विचारून याविषयीची तजवीज करीन. जोशी : बाई, मी आता येतो, याविषयी तू तजवीज करच, चुकु नको बरें ? तुझे कल्याण व्हावे म्हणून मी हे सर्व तुला सांगितले आहे. बाई : जा खरे, पण तुम्ही पुन्हा कधी इकडे पायधूळ झाडाल, हे मला अगोदर सांगा. जोशी : आता माझें येणे कशाचें? माझ्यामागे अशी पुष्कळ लचांडे आहेत. बाई : तर मग तुम्ही राहतां तरी कोठे हे मला सांगा ? जोशी : जुन्या गंजात कसायांच्या आळींत जैराम जोशाचे घर विचारल्यास भलता एखादा माझे घर दाखवील; कारण मी त्यांच्या शेजारी किंचित पलीकडे उत्तर बाजूस राहात आहे. विदूषकः

जोशी कां कसाई आळीत मेंढराला ग्रहाच्या पीडांपासून मुक्त करण्याकरितां राहात

आहेत? बाई : आता या वेळेस तुम्ही जा, मी दोन तीन दिवसांच्या आंत तुम्हास बोलावणे पाठविल्यास कृपा करून या बरें ! (असे म्हटल्याबरोबर जोशी घरी चालतां झाला.) (नंतर जोगाबाईने मोठ्या घाईने स्वयंपाक तयार करून ऊंबऱ्यात नवऱ्याची वाट पहात सली, इतक्यात तिचा नवरा घरी आला. यानंतर तिने त्यांस भोजन घालून आपण जेवतेवेळी त्याशी कांहीं संभाषण केले ते तेथें खाली लिहिल्याप्रमाणे आहे). बाई : काहो ग्रहाच्या पीडा खऱ्या आहेत काय? नवरा : अगे खरे नाहीत तर का खोट्या आहेत; ब्राह्मण लोक नेहमी ग्रह फार छळणारे आहेत, म्हणून आपणास पाद्री उपदेशकांसारखे सांगत फिरतात; तर हे त्यांचे सांगणे खोटे आहे, असें तुला वाटते काय? विदूषक : कुणब्यास त्याच्या बायकोपेक्षा ज्ञान नसण्याचे कारण विद्येची बंदी नव्हे काय? बाई : खोटे वाटत नाहीं; म्हणून तुम्हास विचारले, कारण आज सकाळी खाटिक आळीतल्या जोशीबुवांनी येऊन, आपल्या होणाऱ्या मुलाविषयी फारच विपरित सांगितले आहे.