पान:Samagra Phule.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८ होणाऱ्या मुलावर महात्मा फुले : समग्र वाङ्मय जोशी : (काही हसल्यासारख करून) हँ! ह! असे आहे काय? बाई तुला सर्व समजते (असे म्हणून कंबरेची तपकिरीची डबी काढून, मिशांवर ताव देऊन मोठ्या डौलाने नाकांत मोठे झटके मारमारून कोंदीत आहे, जसा का कोणी दयाराम आत्मारामाचा लेकच.) बाई : (इतक्यात बाईनें कडसरीची पावली काढून जोशास म्हणाली) ही घ्या तुमच्या डाळ तांदुळास. जोशी : थांब, मला तपकीर तर ओढू तुझी बेटे सर्व कामाची घाईच. विदूषक : जोशाला येवढी वेळ जलदी झाली होती, आणि आतां थांब म्हणू लागला, कारण बुवाजीची तुंबडी भरली ना? बाई : महाराज आता स्वस्थता होऊन समाधानी झाली ना? जोशी : (मान हालवून) झाली खरी, पण आता वसूं नकों जलदी करून, एक पैसा आणि लहानशी सुपारी या मजजवळच्या पंचांगाला वाहा, म्हणजे मी तुझ्या ग्रहाच्या येणाऱ्या पीडां दुर करण्याविषयी उपाय सांगतो. (इकडे या बाईजवळ सध्या पैसा नाही; म्हणून शेजारिणीपासून, हातउसना घेऊन, कडसरीची एक सुपारी काढून, जोशाचे पुढे ठेवून, मोठ्या नम्रतेने त्याच्या पाया पडून, जरा किंचित पलीकडे कपाळावर हात ठेवून मोठी उदास होऊन बसली, आणि सांगा महाराज असे म्हणाली.) विदूषक : महाराज, पोटाची आगच फार कठीण आहे बरे! जोशी : बाई, तुझे नावराशीचे नाव काय? बाई : माझे नांव ? माझे नाव जोगाई. (नंतर जोशाने राशीचक्र आपल्यापुढे मांडून, काही वेळ उजव्या हाताच्या आंगठ्याच्या अग्राचे टोंक बाकीच्या बोटाच्या पेयांवर नाचवून, तोंडातल्या तोंडात पुटपुट करी, नंतर काही वेळ दांत (पुटपुट) ओठ खावून, बाईच्या तोंडाकडे वारोवार पाहिल्यासारखे करून) जोशी : बाई तुझ्या नावाची मकर रास आहे. मकरराशीचा शनी तुझ्या मुलाला छळल्यावाचून राहणार नाही, हे खचित असें तू समज; याला उपाय तू सध्या नेहमी आजपासून, दर शनिवारी पंचमुख्या मारुतीवर एक रुईच्या फूलाची अथवा पानाची का होईना माळ करून घालीत जा; म्हणजे तेणेकरून तुझ्या जिवाला काही समाधान वाटत जाईल, व दुसरे तूं जर, मारुतीस असे कबूल करशील की, जे (हे) मारुतीराया माझ्या होणाऱ्या मुलावर ग्रहांनी पीडा करूं नयेत म्हणून सध्यां तूं त्यास कांही आटकाव करावास म्हणून मी तुझे तेवीस ब्राह्मण तूपपोळ्यांचे या पुढल्या, श्रावणमासी घालीन, तरच तुमच्या मुलाला काही दिवस बाधा होणार नाही. विदूषक : ग्रहाच्या पीडा अगदी खोट्या आहेत. असे जोशाच्या बोलण्यावरून सिद्ध झाले; ते असें की जोशी आणि जोगाई या दोघांची एक रास असून शनीग्रह जोगाईला पोळ्या