पान:Samagra Phule.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७ तृतीय रल जोशी : तू दाणे देशिल खरे, पण त्याला दळणावळ, जळण, याखेरीज भाजी, तुपाला कांही नको? तुझें एकटे दाणे घेऊन, घुगऱ्या करून खाऊं काय? बाई : महाराज, तुमच्यापुरते सर्व काय जे पाहिजे ते सर्व मी देते, पण तुम्ही माझ्या होणाऱ्या बाळावरील ग्रह कसे दूर होतील, याविषयी उपाय सांगाच म्हणजे तुमचे मजवर मोठे उपकार होतील. जोशी : तुम्ही कुणब्याच्या बायका! काय बोलल्याप्रमाणे कराल? अगे तुझा नवरा आता आला म्हणजे तूं आपली घरात जाऊन बसशील, मग माझे इकडे काही का होईना. बाई : महाराज असें कसे होईल? कारण माझा नवरा नेहमी असे म्हणत असतो, की वर्णानाम ब्राह्मण गुरू, ब्राह्मणास दिल्याने काही कमी होत नाही; पण मला चाकरी फार हलक्या दरज्याची काय करू ? ईश्वर जर माझ्या धन्याच्या मनात उभा राहून माझा पगार वाढवतील तर, खचित मी ब्राह्मणास पाहिजे ते देईन (इकडे जोशी गालातल्या गालात हसून, मिटक्या मारित आहे.) यावरून तुम्ही काही त्यांचे भय बाळगू नका. परंतु लाचारीमुळे कदाचित (घरातल्या घरात) माझ्याशी काही कुरकुर केली तर करतील, परंतु महाराज मी घरांतून जाऊन येई तो पर्यंत थांबा थोडेसे (असे म्हणून चालती झाली). विदूषक : जोशीची फसविण्याची गोळी तीरासारखी लागू झाली, नाहीं बरें? जोशी : बाई, नको नको, मला जाऊ दे आता, पुरे तुझ्या गप्पा. बाई : (घरात घाईने जात असतां मागे तोंड करून) थोडीशी तर कळ काढा आता मी आले असे समजा. जोशी : मला जाऊ देईनास, मजजवळ तुझें असें काय काम? बाई : (मडक्याच्या उतरंडी उतरीतांना, मोट्याने ओरडून म्हणाली) मी तुमच्याच खटपटीत

आहे महाराज, जाल नाहीतर. (काही एक पळाने त्या बाईने सुमारे पायलीभर बाजरी एका टोपल्यात घालून बाहेर जोशाजवळ ओसरीवर घेऊन आली, आणि म्हणाली.) जोशीबुवा, हे घ्या दाणे. तुम्हाला पुरे होतील ना? जोशी : (मोठा रागावून) आम्ही तुझ्या नवऱ्यासारखे घण घेऊन लोखंडी कुटीत असतो काय? वाहःवा! वाहःवा! बरीच कीगें आहेस तूं! आम्ही निस्त्या भाकरीच खाल्ल्याने, तीन दिवस तरी जगू? आम्हा ब्राह्मणास एक वेळ तरी भात पाहिजे का नको? विदूषक : अहो जेथे पसाभर दाणे मिळण्याची भ्रांत, तेथून जोशी कसा भात युक्तीने काढीतात. बाई : महाराज, इतके उतावीळ होऊ नका, मी त्याविषयी तजवीज योजिली आहे.