पान:Samagra Phule.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(अठरा) महात्मा फुले : समग्र वाङ्मय विभक्त व एकेकांचे शत्रू बनवून ख्रिश्चन, मुसलमान इत्यादी भेद पाडले आहेत. हे भेद भयानक धर्मकल्पनांवर आधारलेले आहेत, असे ते वारंवार सांगतात. धर्मग्रंथ हे ईश्वरप्रणीत किंवा ईश्वरी प्रेरणेने निर्माण केलेले आहेत असे म्हणणाऱ्या धर्मसंस्थांचा त्यांनी निषेध केला. धर्मात जे जे काही सांगितलेले असते ते सत्य होय, ही अंधश्रद्धा नाहीशी झाली पाहिजे, असाही ते वारंवार इशारा देतात. जगातील सर्व धर्म हे गैरसमजांवर व अंधश्रद्धेवर उभारले आहेत, यांच्यामध्ये जे जे काही सांगितले आहे ते सत्य आहे असे आपण म्हणता कामा नये, असे ते म्हणतात. “निर्मिक म्हणजे ईश्वर" जोतीबांनी विश्वनिर्माणकर्त्यास “निर्मिक' हा नवीन शब्द वापरला आहे. याचे कारण जगातील सर्व ईश्वरवाचक जे जे प्रचलित शब्द आहेत, त्या शब्दांच्या पाठीमागे आराधना, भक्ती किंवा पूजा करण्याचे एक निरनिराळे कर्मकांड आहे. हे सर्व कर्मकांड व्यर्थ व मानवांच्या मध्ये सामाजिक फूट पाडणारे आहे. असे त्यांचे मत आहे. म्हणून त्यांनी ईश्वर, अल्ला, गॉड, ब्रह्म इत्यादी ईश्वरवाचक रूढ शब्द काढून टाकले. मानवांची सेवा किंवा मानवी समतेचे व स्वातंत्र्याचे रक्षण ही खरी ईश्वराची पूजा होय, असे ते म्हणतात. जोतीबांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील सत्यशोधक चळवळीचे रूपांतर ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादात झाले. त्यांना जोतीबांच्या बुद्धिवादाचा व विश्वमानवतावादाचा स्पर्श झालेला नाही असे दिसते. सत्यशोधक चळवळीचा विपर्यास म्हणजे ब्राह्मण-ब्राह्मणेतर चळवळ होय. हा विपर्यास कसा होय हे दाखविण्याची ही वेळ आहे. भारताला परकीय आक्रमणापेक्षा यादवीयुद्धाचा अधिक धोका आहे. नकारात्मक आंदोलन कायम राखल्यास हे यादवी युद्ध अधिक तीव्र स्वरूप धारण करील. यादवी युद्धाच्या आगमनाची चिन्हे दिसू लागली आहेत. जोतीबांनी सांगितलेले अर्धसत्यच या चळवळीमध्ये अजून प्रभाव गाजवीत आहे. यामध्ये ब्राह्मण-प्रधान जातिवाद जाऊन त्या ठिकाणी नवा जातिवाद उभा होण्याचा संभव आहे. जोतीबांनी सांगितलेले विचार जातिभेदातीत व धर्मभेदातीत होते, हे लक्षात घेतले तरच हे जोतीबांच्या सत्याचे संपूर्ण स्वरूप लक्षात आले असे होईल. पृथ्वीवर देवाचे राज्य यावे याकरिता एखादा द्रष्टा एकदम प्रकट होतो व तो एका मंगल सत्याचे बीज देऊन जातो. त्या सत्याचे ते संपूर्ण बीज रोवले तर त्यातून देवाचे राज्य पृथ्वीवर निर्माण होऊ शकते. परंतु असे कधी झाले नाही. कारण अनुयायी त्या सत्याचा अर्धाच भाग स्वीकारतात व नरकाचा धोका निर्माण होतो. अंतर्गत यादवी हा सामाजिक नरक होय. “गुलामगिरी” किंवा “सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक" या दोन पुस्तकांतील जोतीराव फुले यांची भारताच्या राजकीय, धार्मिक व सामाजिक इतिहासाची उपपत्ती ही एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील युरोपीयन व इंग्लिश इतिहासकारांनी लिहिलेल्या ग्रंथाच्या आधारे जोतीबांनी सांगितलेली आहे हे त्यांच्या "शेतकऱ्याचा असूड' या निबंधाच्या तळातील M