पान:Samagra Phule.pdf/२१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

0-- १७४ महात्मा फुले : समग्र वाङ्मय धों-- भागवत त्याच वेळेस केले असावे काय? जो o-- भागवत त्याच वेळेस केले असते तर सर्वांच्या मागून झालेल्या अर्जुनाच्या जन्मेजय नांवाच्या पणतूची हकीकत त्यामध्ये कधीच आली नसती. धों - तुमचे म्हणणे रास्त आहे. कारण त्याच भागवतामध्ये अनेक पुरातन मनःकल्पित भाकड दंतकथा अशा आढळतात की, त्यापेक्षां इसापनीति हजार वांट्याने बरी म्हणवेल. तिच्यामध्ये मुलांची मनें भ्रष्ट होण्याजोगी एकसुद्धां गोष्ट आढळत नाही. जो त्याचप्रमाणे मनुसंहिता ही भागवताचे मागून केली असावी म्हणून शाबीत करतां येतें. धों काय? मनुसंहिता भागवताचे मागून केली असावी ! असें कसे होईल? जो -- कारण भागवतांतील वशिष्ठाने, मी खून केला नाही, म्हणून सुदामन राजासमोर शपथ घेतल्याची उपमा मनूने आपल्या ग्रंथाच्या ८ व्या अध्यायाच्या ११० श्लोकांत कशी घेतली? त्याचप्रमाणे, विश्वामित्राने विपत्तिकाळी कुत्र्याचें फरें खाल्याविषयी त्याच ग्रंथाच्या १० व्या अध्यायामध्ये १०८ श्लोकांत कशी उपमा घेतली? याखेरीज त्याच पुस्तकांत अनेक विरुद्ध गोष्टी सांपडतात. -- भाग १० वा -- दुसरे बळीराजे, ब्राह्मणधर्माची फजीती, शंकराचार्याचे कृत्रिम, नास्तिक मत, निर्दयपणा, प्राकृत ग्रंथकार, कर्म आणि ज्ञानमार्ग, बाजीराव, मुसलमानांचा द्वेष आणि अमेरिकन व स्कॉच उपदेशकांनी ब्राह्मणांचा कृत्रिमरूपी कोट फोडला इत्यादिकांविषयी. धों आतां मात्र शिकस्त झाली. कारण आपण शिवाजीच्या पवाड्याच्या प्रस्तावनेंत लिहिल्याप्रमाणे साफ सिद्ध होते की, चार घरच्या चार ब्राह्मण ग्रंथकार पोरी मिळून त्या, घरांतल्या घरकुंडांत बराच लटक्यामुटक्यांचा खेळ खेळल्या. जो परंतु पुढे जेव्हां तो एक दीनांचा कैवारी, महापवित्र, सत्यज्ञानी, सत्यवक्ता बळीराजा या जगांत उत्पन्न झाला, तेव्हां त्याने जो आपला सर्वांचा उत्पन्नकर्ता व सर्वांचा महापिता, त्याचे हेतु मनी धरून त्याने आपला सर्वांस दिलेल्या सत्यमय पवित्र ज्ञानाचा व अधिकाराचा सर्वांस सारखा उपभोग घेतां यावा, यास्तव त्याने एकंदर सर्व भटांसारख्या कृत्रिमी, दुष्ट आणि मतलबी फांसेपारध्यांच्या दास्यत्वापासून आपल्या दीन व दुबळ्या आणि गांजलेल्या बांधवांस सोडवून देवाचें राज्य स्थापन करण्याची सुरवात करून त्याने आपल्या वडील बायांचे कांहींसें भविष्य पूर्ण केलेंसें वाटते. अरे, जेथे मिस्टर टॉमस पेन्सासारिख्या मोठमोठ्या विद्वनांच्या पूर्वजांनी या बळीराजाचे अंकीत होऊन आपल्या मागच्या सर्व इडापीडा दूर करून सुखी झाले. परंतु अखेरीस जेव्हा त्या बळीराजास चार दुष्ट लोकांनी सुळावर देवविलें तेव्हां एकंदर सर्व युरोपखंडांत मोठी ढवळाढवळ होऊन