पान:Samagra Phule.pdf/२१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गुलामगिरी १७३ धों-- जादूमंत्रविधी करून अज्ञानी माळ्यां कुणब्यास गंडे घालून फसवितात. तथापि त्या बापुड्या दुर्दैवी हतभाग्यांस त्या ढोंगी गारुड्यांचे कपट शोधून काढण्यास फुरसतच होत नाही. कारण, सर्व दिवसभर आपल्या शेतीत खपून आपल्या मुलाबाळांचे पोषण करून सरकारची पट्टी पुरी करितां करितां त्यांच्या नाकास नऊ येतात. -तर मग ब्रम्हाच्या मुखापासून चार वेद स्वयंभू निघाले म्हणून कित्येक ब्राह्मण मोठी शेखी करून बोलतात, याला बाध येतो. जो हे सर्व खोटे आहे. कारण त्यांचे बोलणे जर खरें मानावे तर ब्रह्मा मेल्यानंतर ब्राह्मणातील कित्येक ब्रह्मऋषीनी अथवा देवऋषींनी केलेली सुक्ते ब्रह्माच्या तोंडातून निघालेल्या वेदात कशी आढळतात? त्याचप्रमाणे चार वेदांची रचना एकाच कर्त्याने एकाच काळी केली म्हणून सिद्ध होत नाही; असे कित्येक युरोपियन परोपकारी ग्रंथकारांनी सिद्ध करून दाखविले आहे. C धों C-- भटांनी हा ब्रह्मघोळ केला तरी केव्हा? -- जो -ब्रह्मा मेल्यानंतर कित्येक ब्रम्हऋषींनी ब्रम्हाच्या लेखाचे तीन भेद म्हणजे वेद केले व पुढे त्या तीन वेदांत अनेक ब्रह्मऋषींनी अनेक तहेचे फेरफार करून त्यांस ज्या काही पूर्वीच्या भाकड दंतकथा माहित होत्या, त्यांची त्यांनी त्याच मासल्याची कवने करून त्यांचा एक नवीन चवथा वेद केला. इतक्यांत परशुरामाने लाणासुराच्या रयतेस असें धुळीत मिळविल्यामुळे सहजच ब्राह्मणांच्या वेदमंत्रजादूचे वजन इतर सर्व क्षेत्रपतींच्या मनावर बसले, ही संधी पाहून नारदासारख्या बायकांतील पावली-कम-आठ भाऊजीने रामचंद्र आणि रावण, कृष्ण कंस व कौरव आणि पांडव या सर्व देवभोळ्या क्षेत्रपतींच्या घरोघर रात्रंदिवस खेट्या घालून त्यांच्या बायकापोरांसमोर कधी कधी आपल्या विण्याची तुणतुण तार वाजवून व कधी त्यांच्यापुढे थयथय नाचतां टाळ्या पिटून त्यांस वरकांती ज्ञान उपदेश करण्याचा भाव दाखवन आंतून एकमेकांस एकमेकांच्या लांडलबाका सांगून त्या सर्वाचे आपआपसांत तंटे लावून एकंदर सर्व वाहाण लोकांस निर्वेध केल्यामुळे ब्राह्मण ग्रंथकारांनी तेवढ्या कालात सर्व लोकांची नजर चुकवून, आपली सर्व वेदरांत्रजादू व तत्संबंधी भाकडे दंतकथा होत्या तेवढ्याशी सरासरी मेळ घालून त्यांनी अनेक स्मृल्या, संहिता, शास्त्रे, पुराणे, वगैरे भारेचे भारे नवीन ग्रंथ प्रांतल्या घरात बनवून त्या सर्वांत शूद्रांबर ब्राह्मण लोकांचे वर्चस्व स्थापून त्यांनी आपल्या वडिलोपार्जित शिपाईगिरीच्या मार्गात कांटी टोकून मोठा धार्मिकण्णाचा डौल घातला. हे सर्व ब्रम्हकपट पुढे कधी शूद्रांच्या ध्यानात येऊ नये या भयास्तव, अथवा त्या ग्रंथात पाहिजेल तसे फेरफार करितां यावेत म्हणून त्यांनी शूद्र वगैरे पाताळी घातलेल्या लोकांस मुळीच कोणी तान देऊ नये, असे मनुसंहितेशारिख्या अपवित्र ग्रंथात फारच मजबूत लेख करून ठेविले आहेत.