पान:Samagra Phule.pdf/२१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गुलामगिरी १७५ कोट्यावधी लोक त्याचे मतानुयायी झाले व ते आपल्या उत्पन्नकर्त्यांच्या नेमाप्रमाणे या जगांत त्याचेच निवळ राज्य स्थापावे म्हणून रात्रंदिवस झटू लागले. अशा संधानांत एकंदर सर्व या देशात थोडीशी स्वस्थता झाल्याबरोबर येथील कित्येक बुद्धिमान बळींनी त्या घरकुंड्यांतील पोरीसोरींच्या लटक्यामुटक्या खेळाची बरीच दाणादाण केली. म्हणजे सांख्यमुनिसारख्या विचारी सत्पुरुषांनी ब्राह्मणांच्या वेदमंत्रजादूविधिप्रमाणे देव्हारा घुमवून गुराढोरांचा वध करून ढवरे व पालेजत्रांच्या निमित्ताने गोमांस खाणाऱ्या, गर्विष्ट, दांभिक, मतलबी, अनाचारी इत्यादि दुर्गुणांनी भरलेल्या अशा ब्राह्मणांनी केलेल्या एकंदर सर्व चेटकांनी भरलेल्या ग्रंथांच्या मुखावर तेल काजळाचें माखण करून बहुतेक ब्राह्मणांस शुद्धीवर आणून त्यांस आपले धर्मानुसारी केले. परंतु त्यांतून कित्येक उरलेले कुतर्की ब्राह्मण करनाटकांत पळून गेल्यानंतर त्या लोकांमध्ये शंकराचार्य नामें करून एक त-हेची तरकट विद्या जाणणारा महापंडित उत्पन्न झाला. त्याने आपल्या ब्राह्मणजातीच्या दुष्ट कर्माची सर्व ठिकाणी फजिती व निंदा होऊ लागली व बुद्धधर्माचा प्रसार होत चालला, हे पाहून त्यास सहन होईना. त्याने आपल्या लोकांचा उदरनिर्वाहाचा रोजगार ठीक चालेना म्हणून ज्या दुष्ट कर्मावरून आपल्या वेदांसहित सर्व ग्रंथांचा बौद्ध लोकांनी धिःक्कार व पराभव केला होता, त्यापैकी गोमांस खाणे व दारू पिणे मात्र बंद करून एकंदर आपल्या सर्व ग्रंथांत फेरफार करून त्या सर्वांस मजबुती येण्याकरितां एक नवीन नास्तिक मत उपस्थित केलें; त्यास हल्ली वेदांत अथवा ज्ञानमार्ग म्हणतात. नंतर त्याने शिवलिंगांची स्थापना करून या देशांत जे तुर्क येऊन राहिले त्यांस हिंदु लोकांतील क्षत्रिय लोकांत सरते करून घेऊन त्यांच्या मदतीनें, मुसलमान लोकांप्रमाणे तरवारीने, बुद्ध लोकांचा पराभव करून पुनः त्याने त्या आपल्या उरलेल्या जादूमंत्रविद्येचे आणि भागवतांतील भाकड दंतकथेचे वजन अज्ञानी शूद्रांच्या मनांवर बसविलें. या शंकराचार्याच्या धुमाळीत त्याच्या लोकांनी कित्येक बुद्धधर्मी लोकांस तेल्याच्या घाण्यांत पिळून मारिलें आणि त्यांचे बहुतेक उत्तम उत्तम ग्रंथ जाळून टाकिले. फक्त त्यापैकी अमरकोश मात्र त्यांनी आपल्या उपयोगाकरितां ठेवून घेतलो. पुढे जेव्हां त्या शंकराचार्याचे दिवाभीत शिष्य आराध्यासारखे दिवसा मशाली पेटवून पालखींत बसून चहूंकडे विठ्ठल सुवासिनीसारिखे सोवळेचाव करून नाचत फिरूं लागले, तेव्हां मुकुंदराज, ज्ञानेश्वर वगैरे रामदासासारिखे अनेक 'पावलीचे पंधरा आणि अधोलीचे सोळा' ब्राह्मण ग्रंथकार होऊन व्यर्थ वायां गेले. परंतु त्यांतून एकानेही आपण शूद्रांच्या गळ्यांतील दास्यत्वाच्या पट्ट्याला बोटसुद्धां लावून दाखविलें नाही. कारण त्यांस त्यांच्या एकंदर सर्व उरलेल्या दुष्ट कर्मांचा उघड रीतीनें त्याग करण्याचे धैर्य होईना. सबब त्या सर्व दुष्ट कर्मास कर्ममार्ग आणि नास्तिक मतास ज्ञानमार्ग असे निरनिराळे दोन भेद करून त्यांविषयी त्यांनी अनेक भारेचे भारे पोकळ प्राकृत ग्रंथ करून आपल्या मतलबी जातीस, अज्ञानी शूद्रांस लुटून खाऊ दिले. परंतु पुढे जेव्हां नित्यशः रात्री जी नाही ती लाजीरवाणी दुष्टकर्मे आचरून लागलीच दुसरे दिवशी फक्त आपल्या उत्पन्नकर्त्यास मात्र भजणाऱ्या मुसलमानाचे, सव्वा प्रहर दिवस येईपावेतों, तोंड न पहावे म्हणून सोवळे पाळणाऱ्या विटाळशा रावबाजीच्या मजलशीच्या अखेरीस आदिभैरव रागाच्या आरंभी एकंदर सर्व ब्राह्मणांच्या तुणतुण्याची