पान:Samagra Phule.pdf/२११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७० महात्मा फुले : समग्र वाङ्मय झालेली कांही कुळे हल्ली परभू लोकांचे समाजात सांपडतात. त्याचप्रमाणे परशुरामाच्या धुमाळीत रामोशी, जिनगर, तुंबडीवाले व कुंभार वगैरे जातीचे लोक असावेत. कारण कित्येक रीतीभातींमध्ये त्यांचा शूद्रांशी मेळ मिळतो. सारांश, हिरण्याक्षापासून बळी राजाच्या पुत्राचा ' निर्वंश होईतोपर्यंत एकंदर सर्व त्या कुळाचा नीर काढून त्याच्या लोकांची अशी राखरांगोळी करून त्यांस धुळीस मिळविले. यावरून ब्राह्मण लोक जादूविद्येत मोठे प्रवीण आहेत म्हणून बाकी सर्व अज्ञानी क्षेत्रपतींच्या मनावर वजन बसून, ते ब्राह्मणांच्या मंत्रांस अतिशय भिऊं लागले खरे; परंतु इकडे परशुरामाच्या मूर्खपणामुळे त्यांच्या धुमाळीत ब्राह्मणांचा फार क्षय झाला. यामुळे एकंदर सर्व ब्राह्मण लोक त्याच्या नावाने हाकल्या मारावयास कोठे लागले, कोठे नाहीं तो इतक्यांत येथील एका क्षेत्रपतीच्या रामचंद्र या नावांच्या मुलाने परशुरामाचें धनुष्य जनक राजाचे घरीं भरसभेत भंग केल्यामुळे परशुरामाने ती चुरस मनांत धरून, रामचंद्र आपल्या घरी जानकीस घेऊन जात आहे अशी संधी साधून रामचंद्रास रस्त्यांत गांठून त्याजबरोबर युद्ध केले. त्यामध्ये परशुरामाचा मोड झाल्यामुळे तो इतका खजील झाला की, त्याने आपल्या सर्व राज्याचा त्याग करून आपल्या कुटुंबासहवर्तमान थोडेसे लोक बरोबर घेऊन तळकोंकणांत जाऊन राहिला. तेथें अखेरीस त्यास त्याच्या पूर्वी केलेल्या एकंदर सर्व दुष्ट कर्माचा पश्चाताप झाल्यामुळे त्याने आपला जीव कोठे व कधी व कसा दिला, याचा कोणास शोध लागू दिला नाही. धों - परशुराम हा आदिनारायणाचा अवतार आहे, तो चिरंजीव आहे, त्याला मरणच नाही, असे सर्व ब्राह्मण आपल्या ग्रंथांच्या आधारावरून बोलतात आणि आपण तर म्हणतां परशुरामाने जीव दिला, हे कसे? जो दोन वर्षांपूर्वी मी शिवाजीच्या पवाड्यांत पहिल्या अभंगांत “सर्व ब्राह्मणांनी आपल्या परशुरामास पाचारून आणून त्याच्या साक्षीनिशी माझ्यासमक्ष हल्लीच्या मांगमहारांचे पूर्वज परशुरामाशी एकवीस वेळा लढणारें महाआरी क्षत्रिय होते किंवा नाहीं म्हणून पदरांत माप घ्यावे, याविषयी ब्राह्मणांस सूचना दिली; आतां त्यांनी परशुरामास पाचारून आणिलें नाही. यावरून परशुराम हा खरोखर आदिनारायणाचा अवतार असून चिरंजीव असता तर ब्राह्मणांनी कधीच त्यास धुंडून आणून माझी तर काय, पण एकंदर 150-- -- बाणासुराची कन्या उषा ही कृष्णाच्या प्रद्युम्न नांवाच्या मुलास दिली होती. अभंग - अति महारथी क्षत्रियांचा बाळ ।। यवनाचा काळ त्रेतायुगी ॥ १ ॥ स्वभावें तो शूर रणी भिडणार ॥ लढे अनिवार देशासाठी ॥ २ ॥ परशुरामाशी झोंबे महाबळी ॥ एकवीस वेळी लागोपाठ ॥ ३ ॥ अशा महावीरा म्हणे महाअरी ।। धाके थरथरी द्विजसूत ॥ ४ ॥ बोधी, शिऊं नका मोड झाल्यावर ।। म्हणा महाआरी मांग त्यास ॥ ५॥ भित्रा सूड घेई जिंकल्या शत्रूचा । पूत कृतघ्नचा सर्प जैसा ॥ ६ ॥ चिरंजीव आहे आण पाचारूनि ।। पहा तपासून जोतीपुढे ॥ ७ ॥