पान:Samagra Phule.pdf/२१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गुलामगिरी १६९ जो-- धों --- त्याच्या अमलांत काय झाले? प्रजापती मरतांच बाकीच्या उरलेल्या महाअरींनी ब्राह्मणांच्या हाती सांपडलेल्या आपल्या बांधवांस ब्राह्मणांच्या दास्यत्वापासून सोडविण्यासाठी परशुरामाशी एकवीस वेळां इतके निकराने लढाया केल्या की, त्यांचे अखेरीस द्वैती म्हणून नांव पडले व त्या शब्दाचा पुढें अपभ्रंश ‘दैत्य' झाला. जेव्हा परशुरामाने एकंदर सर्व महाअरीचा मोड केला, तेव्हां त्यातून कित्येक महाविरांनी निराश होऊन, आपल्या स्नेह्यांच्या मुलखांत जाऊन आपले शेवटचे दिवस काढिले. म्हणजे जेजुरीच्या खंडेरावाने जसा रावणाचा आश्रय केला, त्याचप्रमाणे नऊ खंडाचे न्यायी व सात आश्रय या सर्वांनी तळकोकणांत जाऊन तेथे छपून आपले शेवटचे दिवस काढिले. त्यावरून ब्राह्मणांनी केवळ धिक्काराने नऊ खंडांचा जो न्यायी त्याचे स्त्रीवाचक निंद्य नांव नऊ खणची जाणाई व सात आश्रयांचे नांव सातीअसरा पाडिलें. बाकी जेवढे महाअरी परशुरामाने रणांगणी कैदी केले तेवढ्यांपासून परशुरामाने, त्यांनी कधी पुनःब्राह्मणांवर कंबरा बांधू नयेत म्हणून क्रियाभाक घेऊन, एकंदर सर्वांच्या गळ्यांत एक एक काळ्या सुताचे दोऱ्याचे चिन्ह ' घालून, त्यांचा, त्यांचे शूद्र बांधवांनी सुद्धा त्यांना स्पर्श करू नये म्हणून प्रतिबंध केला. नंतर परशुरामानें त्या महाअरी क्षत्रियांस, अतिशूद्र, महार, अंत्यज, मांग आणि चांडाळ म्हणण्याचा प्रचार घालून, त्यांस इतकी पीडा देण्याची वहिवाट घातली की, तिला या जगांत दुसरी तोडच सांपडणे नाही. उदाहरण : या निर्दयाने महार, मांग लोकांचा सूड उगविण्याच्या हेतुनें आपल्या लोकांचे मोठमोठे इमारतीच्या पायामध्ये कित्येक मांगास त्यांचे स्त्रियांसह उभे करून, त्यांचे केविलवाणी ओरडण्याची कोणास दया येईल याजकरितां त्यांचे तोंडांत तेल व शेंदूर ओतून त्यांस जिवंतच त्या पायामध्ये दडपण्याची वहिवाट घातली व ती अति क्रुर चाल मुसलमानांचें जसेजसे प्राबल्य होत चाललें तसतशी आपोआप बंद झाली. परंतु इकडे महाअरींशी लढतां लढतां परशुरामाचे इतके लोक मारले गेले की, ब्राह्मणापेक्षा ब्राह्मण विधवांचा भरणा अधिक वाढला व त्यांची नीट रीतीने कशी व्यवस्था ठेवावी याची मोठी पंचाईत येऊन पडली. शेवटी ब्राह्मण स्त्रियांचा पुनर्विवाह अगदीच बंद केला, तेव्हां थोडेसें लागी लागल्यासारखे झाले. परशुराम आपले ब्राह्मण लोकांच्या वधामुळे इतका पिसाळला की, त्याने बाणासुराच्या एकंदर सर्व राज्यांतील क्षत्रियांच्या बीजाचा समूळच नाश करावा, म्हणून शेवटी त्या महाअरी क्षत्रियांच्या निराश्रित गरोदर विधवा स्त्रिया, ज्या इतर अनेक भूमीच्या ठायी आपले जीव घेऊन लपून राहिल्या होत्या, त्यांच्या पोटीं पुढे जन्मणाऱ्या अर्भकांचा जन्म झाल्याबरोबर वध करावा म्हणून परशुरामाने त्यास पकडून आणण्याचा झपाटा चालविला. त्या झपाट्यातून मोठ्या दैवयोगाने वांचलेल्या अर्भकापासून उत्पन्न 5 त्याचप्रमाणे भराड्याचे पुंगीस व वाघ्याचे भंडारीस काळा दोरा आहे तो पहा.