पान:Samagra Phule.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(सोळा) महात्मा फुले : समग्र वाङ्मय धर्म" मध्ये जोतीबांच्या महात्मतेचे तेजोवलय पूर्ण प्रकट झाले आहे. या तेजोवलयाचे तीन भाग आपल्या दृष्टीसमोर पडतात, ते म्हणजे मूलमूत मानवी हक्क, त्यांवर आधारलेला विश्वकुटुंबवाद आणि जीवनाचे व विश्वाचे सत्यस्वरूप प्रकट करणारा बुद्धिवाद हे होत. पश्चिमेकडून म्हणजे आधुनिक पाश्चिमात्य संस्कृतीकडून जोतीबांना या तीन प्रेरणा मिळाल्या. या तीन प्रेरणांतच त्यांची लोकशाही जीवन-दृष्टी सिद्ध होते. मूलभूत मानवी हक्कांच्या आधारावर विश्व-कुटुंब कसे निर्माण होईल व त्याकरिता कशा प्रकारचा वर्तनक्रम व कशा प्रकारची वैचारिक भूमिका स्वीकारली पाहिजे यासंबंधी “सार्वजनिक सत्य धर्म" मध्ये ३३ कलमी नियम मांडले आहेत. जोतीबा म्हणतात, “स्त्री अथवा पुरुष, जे एकदंर सर्व गावाचे, प्रांताचे, देशाचे व खंडाचे संबंधात, अथवा कोणत्याही धर्मातील स्वतःच्या संबंधात, स्त्री आणि पुरुष या उभयतांनी, अथवा सर्व स्त्रियांनी अथवा पुरुषांनी, एकमेकांत, एकमेकांची कोणत्याही प्रकारची आवडनिवड (भेदभाव) न करता या भूखंडावर आपले एक कुटुंब समजून एकमताने एकजुटीने एकमेकांशी सत्य वर्तन करून राहावे. आपणा सर्वांच्या निर्माणकाने, एकंदर सर्व प्राणिमात्रांना उत्पन्न करते वेळी, मनुष्यास जन्मतः स्वतंत्र प्राणी म्हणून निर्माण केले आहे आणि त्यास आपापसांत सारख्या हक्कांचा उपभोग घेण्यास समर्थ केले आहे. आपणा सर्वांच्या निर्माणकर्त्याने, एकंदर सर्व स्त्रियांस अथवा पुरुषांस एकंदर सर्व मानवी हक्कांविषयी, आपल्यास पाहिजे तशी मते बोलून दाखविण्यास, लिहिण्यास आणि प्रसिद्ध करण्यास स्वतंत्रता दिली आहे. परंतु या विचारांपासून, मतांपासून कोणत्याही प्रकारे नुकसान मात्र होऊ नये अशी खबरदारी ठेवावी. त्यास सत्य वर्तन म्हणतात. आपणा सर्वांच्या निर्माणकर्त्याने, एकंदर सर्व स्त्रीपुरुषांस, एकंदर सर्व मानवी अधिकारांचे मुख्य धनी केले आहे. त्यातून एखादा मानव अथवा काही मानवांची टोळी, एखाद्या व्यक्तीवर जबरदस्ती करू शकत नाही व त्याप्रमाणे जबरदस्ती न करणाऱ्यास सत्य वर्तन करणारे म्हणतात. आपणा सर्वांच्या निर्माणकर्त्याने, सर्व मानव स्त्रीपुरुषांस धर्म व राजकीय स्वतंत्रता दिली आहे. जो आपल्यापासून दुसऱ्या एखाद्या व्यक्तीस कोणत्याही त-हेचे नुकसान देत नाही, अथवा जो कोणी आपल्यावरून दुसऱ्या मानवाचे हक्क समजून इतरांस पीडा देत नाही. त्याला सत्य वर्तन करणारा म्हणतात. आपणा सर्वांच्या निर्माणकर्त्यास संतोष देण्यासाठी केलेले वर्तन याला सार्वजनिक सत्य म्हणतात. जो कोणी इतर मानव बंधूंबरोबर सत्य आचरण करील ती नीती म्हणावी, मग 1