पान:Samagra Phule.pdf/२०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

चिखलमाती वाहून गुलामगिरी १६७ जाऊन शूद्रांस किती नीच मानूं लागले की, त्याविषयी सर्व हकिगत लिहूं गेल्यास त्याचा एक स्वतंत्र ग्रंथ होईल. या भयास्तव त्यापैकी काही काही सांप्रत मुद्दे आढळतात. ते थोडक्यांत येथे लिहितों. ते येणेप्रमाणे :- हल्लींचे भट (मग झाडणाऱ्या मांगा-महारासारिखे अक्षरशून्य का असेनात) उपाशीं मरू लागल्यामुळे जी नाही ती नीच कर्मे आचरून पापपुण्याचा विधीनिषेध न मानितां अज्ञानी शूद्रांस फसविण्यास काडीमात्र मागेपुढे पाहात नाहीत. शेवटी त्यांचा कोठे उपाय चालेनासा झाला म्हणजे ते शूद्रांचे दारोदार धर्माच्या मिषाने दोम दोम करून आपली कशी तरी पोटें जाळतात; परंतु शूद्राचे चाकर होऊन त्यांच्या शेतांत गुरे सांभाळून त्यांच्या गोठ्यांतील शेण वाहून शेणखईत नेऊन टाकण्यास, नांगर, कुळव, मोटा आणि गाड्या हांकण्यास, खांदणी, खुरपणी आणि कोळपणी करण्यास, सोनखताच्या पाट्या डोईवर वाहून झाडांस खतविण्यास, कडब्याच्या आळाशा वाहून गंजी रचण्यास,रात्री हातांत काठ्या घेऊन शेतांची राखण करण्यास व त्यांचे शेतांतील धान्याची व भाजीपाल्याची ओझी वाहून त्यांच्या घरी नेऊन टाकण्यास लाजतात. ते शूद्रांच्या घरी चाकरीस राहून त्यांची घोडी खाजवून त्यांच्या घोड्यांपुढे धावण्यांस, त्यांचे जोडे बगलेत मारून सांभाळण्यास, त्यांच्या घरांतील झाडलोट करून त्याची उष्टी काढून खरकटी भांडी घासण्यास, त्यांच्या घरांतील समया घांसून दिवे लावण्यास व त्यांच्या धरी बिगायऱ्यांचे काम करण्यास लाजतात. त्याचप्रमाणे भटणी शूद्रांच्या चाकरिणी होऊन त्यांच्या स्त्रियांस उटणी लावून त्यांस नाहूं घालून त्यांचे केस विंचरण्यास, त्यांच्या घरांतील झाडलोट करून त्यांच्या स्त्रियांचे बिछाने करून त्यांचे पाय चेपण्यास व त्यांच्या स्त्रियांची लुगडी धुऊन त्यांचे जोडे सांभाळण्यास लाजतात. पुढे जेव्हां ते महाआरी आपल्या शूद्र बांधवांस भटांच्या हातांतून सोडवावें म्हणून भटांवर हमेशा हल्ले करूं लागले, तेव्हां एकंदर सर्व भट, शूद्रांचा इतका द्वेष करू लागले की ते शूद्राने शिवलेले अन्नसुद्धा खाईनासे झाले व त्याच द्वेषावरून हल्लींचे भट शूद्र शिवलेले अन्न तर काय; पण ते शूद्र शिवलेले पाणीसुद्धा पीत नाहीत. त्यांनी आपणांस कोणी शूद्रांनी शिवू नये याजकरिता सोवळे होण्याची चाल पाडली. पुढे कित्येक शूद्रद्रोही भट ग्रंथकारांनी, जनांची तर नाही, पण मनाची सुद्धा काडीमात्र लाज न धरितां संधी साधून त्या सोवळ्यांचे इतके महत्त्व वाढविलें कीं, सोवळ्या भटास एकादे शूद्राचा स्पर्श झाला असतांसुद्धा तो वास्तविक अपवित्र होतो, म्हणून त्यांनी धर्मशास्त्रासारखी अनेक अपवित्र पुस्तकें करून ठेविली आहेत; व काही काळानंतर शूद्रांस आपल्या पूर्वीच्या श्रेष्ठत्वाची आठवण झाल्यास ते कधी तरी आपल्या उरावर नाचण्यास कमी करणार नाहीत, या भयास्तव शूद्रास मुळीच कोणी ज्ञान शिकवू नये म्हणून भटांनी बंदी करून तृप्त झाले, इतकेच नाही परंतु त्यांनी त्यापैकी कोणी परमार्थसंबंधी ग्रंथ वाचीत असल्यास त्यांतील एक शब्दसुद्धा शूद्रांचे कानी पडू नये असा प्रतिबंध करून टाकिला. याविषयी मनुसंहितेत दाखलेही सांपडतात. त्या आधारावरून हल्लीचे सोवळे भट तसलें अपवित्र पुस्तक शूद्रांचे समक्ष वाचीत नाहीत. आता जरी खिस्ती म्हणविणाऱ्या इंग्रज सरकारच्या धाकानें विद्याखात्यांतील पोटार्थी