पान:Samagra Phule.pdf/२०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

०-- १६६ महात्मा फुले : समग्र वाङ्मय असतील खरे; परंतु त्यांतून कित्येक भटांस मांस खाण्याची रुची लागलेली संवय सुटेना. त्यांनी काही काळानंतर संधी पाहून त्या नीच कर्माचा दोष छपविण्याकरितां पशुंचा वध करून त्याचे मांस खाण्यामध्ये अगाध पुण्य आहे म्हणून त्या पशुंचे वधास पशूयज्ञ, अश्वमेध वगैरे प्रतिष्ठित नांवे देऊन ती ग्रंथी दाखल केली. धों नंतर ब्रह्माने काय केले? जो -पुढे बळी राजाचा पुत्र बाणासूर मरतांच त्याच्या एकंदर सर्व राज्यांत कोणी मुख्य अधिकारी नसल्यामुळे, जिकडे पहावें तिकडे बेबंद होऊन जो तो आपापल्या घरचा राजा होऊन ऐषआरामात गुंतला. अशी संधी पाहून त्यांने आपल्याबरोबर त्या सर्व बुभुक्षित भट परिवारांस (ज्याचा अपभ्रंश हल्ली “परवारी' होय) घेऊन त्याने राक्षसांवर (रक्षकांवर) एकाएकी रात्री घाला घालून त्यांचा अगदी मोड केला. नंतर त्याने बाणासुराच्या राज्यांत शिरण्याचे पूर्वी असा विचार केला की, पुढे कदाचित न जाणों आपल्यावर एकादें संकट येऊन आपली सर्वांची दाणादाण झाल्यास पुनः आपण आपल्या परिवारांतील एकमेकांनी एकमेकांस ओळखून काढितां यावे, म्हणून ब्रम्हयाने एकंदर सर्व आपल्या परिवारी लोकांच्या गळ्यांत एक एक पांढऱ्या सुताच्या पाष्टीचे जातीसूचक चिन्ह, म्हणजे ज्यास हल्ली ब्रम्हसुत्र म्हणतात, तें घालून व त्या प्रत्येकास एक जातीबोधक बीजमंत्र, म्हणजे ज्यास हल्ली गायत्री म्हणतात, तो शिकवून पुढे त्यांजवर कसाही प्रसंग गुजरला, तथापि त्यांनी तो मंत्र क्षत्रियांस सांगू नये म्हणून तलाख मारून टाकिली. यावरून भट लोक अपापल्या परिवारांतील एकमेकांस एकमेक सहज ओळखून काढू लागले. घों यानंतर ब्रह्मयाने काय केले ? जो 6-~-नंतर ब्रह्मया त्या आपल्या सर्व परवारी भटांस बरोबर घेऊन बाणासुराच्या राज्यांत शिरला आणि त्याने त्यांतील कित्येक लहानमोठ्या सरदारांचा मोड करून बहुतेक क्षेत्र आपल्या हस्तगत करून घेतांत त्यांपैकी रणांगणी कंबरा बांधून लढणाऱ्या महाअरी (हल्लीचा ज्याचा अपभ्रंश महार होय) क्षत्रियांशिवाय जे लोक त्याच्या तावडीत सांपडले होते तेवढ्यांचे मात्र त्याने सर्व हरण करून त्या सर्वांस केवळ सत्तेच्या मदानें क्षुद्र लोक (ज्याचा अपभ्रंश शूद्र होय) मानून आपले दास केले. त्यांतून कित्येकांस आपल्या लोकांच्या घरोघर सेवाचाकऱ्या करण्याकरितां वांटून दिले. बाकी राहिलेल्या शूद्रांची गांवोगांव एकेक भटकामगार पाठवून कुळेवारी करून त्यांजपासून शेतांतील काम करून घेऊन, त्यांचे पोटापुरते अन्न देण्याची वहिवाट घातली. यावरून त्या कामगारांचे नांव कुळेकरणी पडले. (त्याचा अपभ्रंश कुळकर्णी होय.) त्याचप्रमाणे त्या शूद्र कुळांची नांवे कुळवाडी अशी पडली. (त्याचा अपभ्रंश कुळंबी अथवा कुणबी होय) व त्या दास कुणब्यांच्या स्त्रियांस नेहमी शेतीपुरते काम नसल्यामुळे कधी कधीं कारणपरत्वें भटांच्या घरी सेवाचाकऱ्या करावयास जावे लागत असे; यास्तव कुणबीण आणि दासी या दोन शब्दांमध्ये तिळमात्र भेद दिसून येत नाही. वर लिहिलेल्या मूळ आधारावरून पुढे एकंदर सर्व भट उत्तरोत्तर मदांध होत --