पान:Samagra Phule.pdf/२०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गुलामगिरी १६५ जो बाबा! तूं तें भागवत एक वेळ वाचून पहा, म्हणजे तुला त्यापेक्षां इसापनीति बरी वाढू लागेल. 50- जो-- धों-- -- भाग ७ वा ब्रह्मा, ताडपत्रावर लिहिण्याची चाल, जादूमंत्र, संस्कृताचे मूळ, अटक नदीचे पलीकडेस जाण्याची बंदी, पूर्वी घोडी वगैरे जनावरें ब्राह्मण लोक खात होते, भट, राक्षस, यज्ञ, बाणासुराचें मरण, परवारी, सुताचे पाष्टीचे चिन्ह, बीजमंत्र, महार, शूद्र, कुळकर्णी, कुळंबी, कुणबीण, शूद्रांचा द्वेश सोंवळे धर्मशास्त्र, मनू, भट पंतोजीचे शिक्षण, मोठा भयंकर परिणाम, प्रजापतीचे मरण, ब्राह्मण इत्यादिकांविषयीं. धों वामन मेल्यामागें उपाध्यांचा कोण अधिकारी झाला? - याप्रसंगी थोर कुलीन अधिकारी नेमण्याची सवड झाली नाही, सबब ब्रम्हा या नांवाचा एक पटाईत कारकून होता, तोच सर्व राज्यकारभार चालवू लागला. तो मोठा कल्पनेबाज व जशी वेळ पडेल तसे वागून आपला मतलब साधणारा होता. त्याच्या बोलण्याचा काडीमात्र विश्वास नसे, म्हणून त्यास चार तोंडांचा ब्रह्मा म्हणण्याचा प्रचार पडला असावा. सारांश तो अतिशय दक्ष, हट्टी, धूर्त, धाडसी आणि निर्दय होता. ब्रह्मानें प्रथम काय काय केलें? जो ब्रह्मानें प्रथम ताडपत्रांवर खिळ्याने उकरून लिहिण्याची युक्ती काढून व त्यास जे काही इराणी जादूमंत्र व ज्या काही भाकड दंतकथा पाठ होत्या त्यांपैकी कित्येक गोष्टी त्यांत सामील करून त्या सर्वांचे त्याने त्यावेळच्या सर्वकृत (ज्याचा अपभ्रंश संस्कृत) चालू भाषेत, आतांच्या फारशी बयतीसारिखी लहान लहान कवने करून त्या सर्वांचा सार ताडपत्रांवर टिपून ठेविला. पुढे त्याची फार प्रशंसा वाढली आणि तेणेकरून ब्रम्हयाच्या मुखापासून त्या कादंबऱ्यासहित जादूमंत्र विद्या (वेद) निघाली म्हणून म्हणण्याची वहिवाट पडली असावी. इतक्यांत उपाध्ये लोक उपासाने मरूं लागले, यामुळे ते इराणांत परत माघारे चोरुन छपून पळून जाऊ लागले; तेव्हा त्याने अटक नदीस अथवा समुद्रास कोणी उल्लंघून पलीकडेस जाऊ नये म्हणून तलाख घालून बंदोबस्त केला. धों त्यांनी मग त्या झाडीत काय काय खाऊन आपले जीव वाचविले? -त्यांनी मग तेथील झाडांची फळे, पाने, जमिनीतील कंदमुळे व जंगलांतील अनेक तहेचे पशुपक्षी तर काय, पण कित्येकांनी अखेरीस आपल्या बसत्या घोड्यांचा सुद्धां वध करून त्यांस भाजून खाऊन आपले जीव वाचविले. यामुळे त्यांजवरचे रक्षक त्यांस भ्रष्ट म्हणूं लागले. पुढे रक्षक शब्दाचा अपभ्रंश राक्षस आणि भ्रष्ट या शब्दाचा अपभ्रंश भट झाला. नंतर त्या भटांनी अशा अडचणीत पडल्यामुळे नानात-हेच्या प्राणीमात्रांचे मांस खाल्लें व त्याची त्यांस लाज वाटू लागल्यामुळे त्यांनी तें खाण्याची बंदी करण्याचे प्रयत्न केले -- जो--