पान:Samagra Phule.pdf/२०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जो-- १६४ महात्मा फुले : समग्र वाङ्मय बंब्याने जेव्हां आपलें दुसरे पाऊल आकाशांत ठेवितेवेळी तेथे अतिशय दाटी झाल्यामुळे कित्येक ताऱ्यांच्या एकमेकांवर आदळून चुराडा झाला असेल की नाहीं बरें! तिसरे असे की, त्या बंब्याने आपल्या दुसऱ्या पावलांत जर सर्व आकाश आटविलें तर त्याचे कंबरेपासून वरचे धड कोठे राहिले असावें? कारण मनुष्याचे दुसरे पाऊल फार झाले तर त्याच्या बेंबटापर्यंत ऊंच आकाशांत पोहचूं शकते. यावरून त्या बंब्याचे कंबरेपासून त्याच्या मस्तकापर्यंत आकाश उरलें असेल, त्यांत अथवा त्या बंब्याने आपल्याच माथ्यावर आपले तिसरे पाऊल ठेवून आपला करार पुरा करून घेण्याचें एकिकडेस ठेवून त्याने केवळ दगेबाजी करून आपलें तिसरे पाऊल बळीराजाच्या मस्तकावर ठेवून त्याला पाताळी घातलें, हे कसे? धों -- काय तो बंब्या आदिनारायणाचा अवतार ना? आणि त्याच्याने अशी ढळढळीत दगलबाजी कशी करवली? अशा लबाडास आदिनारायणाचा अवतार म्हणणाऱ्या इतिहासकांस धिक्कार असो. कारण त्यांच्याच लेखावरून वामन हा कपटी, घातकी आणि कृतघ्न होता; असे सिद्ध होते, की ज्याने आपल्या दात्यास कपटाने पाताळी घातले. चवथें असें की, त्या बंब्याचे डोके जेव्हां आकाशापलीकडेस स्वर्गात ऊंच गेले असेल, तेव्हां त्यास तेथून बळीस फारच मोठ्याने ओरडून विचारावे लागले असेल की, आतां माझ्या दोन पावलांतच एकदर सर्व पृथ्वी आणि आकाश आटले, यास्तव आतां मी माझें तिसरे पाऊल कोठे ठेवून आपली कबुलायत पुरी करून घ्यावी? कारण आकाशांतील त्या बंब्याचे मुख आणि पृथ्वीवरील बळीराजा यांमध्ये अनंत कोसांचे अंतर पडले असेल; आणि त्यापैकी रशियन, फ्रेंच, इंग्लिश आणि अमेरिकन वगैरे लोकांपैकी एकाहि मनुष्यास त्या भाषणापैकी एक शब्दसुद्धा ऐकू गेला नाही, हे कसें ? व त्याचप्रमाणे पृथ्वीवरील मानव बलीराजाने त्या बंब्यास उत्तर दिले की,नूं आपलें तिसरे पाऊल माझ्या मस्तकावर ठेन हैं तरी त्या बंब्यास कसें ऐकू गेलें असेल? कारण, बळी काही त्यासारिखा विचित्र प्राणी बनला नव्हता पाचवें असे की, त्या बंब्याच्या भाराने ही पृथ्वी रसातळारा गेली नाही, हे मोठे आश्चर्य होय. धों-- नाही तर आपण हे दिवस कोठून पाहिले असते बरे? त्या बब्याने काय काय खाऊन आपला जाव वाचविला असेल? अहो, तो बंब्या गेला असेल तेव्हा त्याच्या त्या अगडबंब मढ्यास स्मशानांत नेण्याकरितां चौरे खांदेकरी तरी कोठून मिळाले असतील ? कदाचित त्यास जागच्या जागीच लाकडें रचून जाळले असेल म्हणावे, तर त्यास जाळण्यापुरती लाकडे किंवा गोवऱ्या तरी कोठन मिळाल्या असतील? बरें तसल्या मढ्यास जाळण्यापुरती लांकडे मिळाली नसतील म्हणावें तर त्याचा जागचे जागीच कोल्हाकुत्र्यांनी खाऊन भंडारा केला असेल काय? सारांश, भागवत वगैरे सर्व ग्रंथांवरून जा सदरी लिहिलेल्या शंकांचे निवारण होत नाही, तर उपाध्यांनी मागाहून संधी पाहून एकंदर सर्व मूळच्या दंतकथांवरून हे सर्व ग्रंथ केले असावेत असे सिद्ध होते.