पान:Samagra Phule.pdf/२०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गुलामगिरी १६३ त्या उपाध्यांनी आपापल्या बि-हाडी एकंदर सर्व आपल्या रणांत पडलेल्या आप्तांच्या नावांने चिता (ज्यास हल्ली होळी म्हणतात) पेटवून त्यांच्या उत्तरक्रिया केल्या, कारण त्यांच्यामध्ये पूर्वीपासून मेल्या मनुष्याचे धडास जाळण्याची वहिवाट सांपडते. त्याचप्रमाणे तेथील सर्व बाणासुरासहित क्षत्रियांनी आपापल्या रणांत पडलेल्या आप्तांच्या नांवाने फालगून वद्य प्रतिपदेस वीर बनून हातांत नागव्या तरवारी घेऊन मोठ्या आनंदाने नाचून त्यांस मान दिला. कारण क्षत्रिय लोकांत मेल्या मनुष्याचे धडास पुरण्याची बहुत दिवसांपासून वहिवाट सांपडते. शेवटी बाणासुराने अखेरीस त्या उपाध्यांचे रक्षणाकरितां कांही लोक तेथे ठेवून बाकी सर्व सरदारांस बरोबर घेऊन आपल्या मुख्य राजधानीत येऊन जो काय आनंद केला, तो सर्व येथे वर्ण गेल्यास ग्रंथविस्तार फार होईल; या भयास्तव त्यांतील सारांश (मात्र देतो.) त्याने आपल्या सर्व धनाची मोजदाद करून अश्विन वद्य त्रयोदशीस त्याची पूजा केली व त्याने वद्य चतुर्दशीस आणि वद्य अमावस्येस आपल्या सर्व सरदारांस उत्तम प्रकारचे खाणे देऊन मौजा मारल्या. नंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेस आपल्या कित्येक सरदारांस त्यांच्या योग्यतेप्रमाणे देणग्या देऊन त्यांस आपापल्या मुलुखी जाऊन कामावर हजर राहण्याचा हुकूम दिला. यावरून येथील एकंदर सर्व अबालवृद्ध स्त्रियांस जो काय आनंद झाला की, त्यांनी कार्तिक शुद्ध द्वितियेस आपापल्या बांधवांस यथाशक्ति भोजन घालून तृप्त केल्यानंतर त्यांनी त्यांस ओंवाळून "इडा पीडा जावो आणि बळीचे राज्य येवो' अशी त्या येणाऱ्या बळीची आठवण दिली. त्या वेळेपासून आजदिवसपावेतों दरवर्षी दिपवाळीत भाऊबीजेस क्षत्रियांच्या कन्या आपापल्या बांधवांस येणाऱ्या बळीच्या आठवणीशिवाय दुसरा आशिर्वाद देत नाहीत; परंतु उपाध्यांचे कुळांत अशा त-हेची आठवण देण्याची वहिवाट मुळीच सांपडत नाही. धों -- तर मग आदिनारायणाने बळीस पाताळी घालण्याकरितां वामनाचा अवतार घेतला. त्या वामनानें भिकाऱ्याचे सोंग घेऊन बळीराजास फसवून, त्यापासून तीन पाउलें पृथ्वी मागून घेतली. नंतर त्याने भिकाऱ्याचे सोंग टाकून इतका मोठा अगडबंब मनुष्य बनला की, त्याने एकंदर सर्व पृथ्वी आणि आकाश आपल्या दोन्ही पाउलांत आटवून बळीराजास विचारले की आतां मी तिसरे पाऊल कोठे ठेवावें? नंतर बळीराजाने लाचार होऊन त्या अगडबंब्यास असे उत्तर दिले की, तूं आतां आपलें तिसरे पाऊल माझ्या मस्तकावर ठेव. असे म्हणतांच त्या बंब्याने बळीराजाच्या मस्तकावर आपले तिसरे पाऊल ठेवून बळीस पाताळी घालून आपला करार पुरा करून घेतला, असे त्याचे उपाध्यांनी भागवत वगैरे इतिहासांत लिहून ठेविलें आहे, ते सर्व तुमच्या या हकीकतीवरून खोटें आहे असें सिद्ध होते. तर याविषयी तुमचा काय अभिप्राय आहे तो कळू द्या. जो आतां यावरून तूंच विचार करून पहा की, जेव्हां त्या बंब्याने आपल्या दोन पावलांत एकंदर सर्व पृथ्वी आणि आकाश आटविलें, तेव्हां त्या बंब्याच्या पहिल्या पावलाखाली कित्येक गावें चेंगरून लयास गेली असतील, नाहीं बरें ? दुसरे असे की, त्या