पान:Samagra Phule.pdf/२०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गुलामगिरी १६१ देशांवरच्या फौजा हजर होण्याच्यापूर्वी, लाचार होऊन आपली खाजगी फौज मात्र बरोबर घेऊन वामनाबरोबर लढाया देण्याची सुरुवात केली, ती येणेप्रमाणे--- बळी भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून वद्य अमावस्येपावेतों दररोज वामनाशी लढून संध्याकाळी परत आपले महालांत आरामास येत असे. यावरुन दोन्ही पक्षांतील जेवढे लोक त्या पंधरवड्यांत एकमेकांशी लढतांना पडले, त्यांच्या मरणाच्या तिथी ध्यानात राहिल्या. सबब दरवर्षी भाद्रपदमाशी त्या त्या तिथीस पक्ष घालण्याची वहिवाट पडली असावी, असा तर्क निघतो. नंतर अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध अष्टमीपावेतों बळीराजा वामनाबरोबर लढाया लढण्यांत इतक गुंतला की, त्यास देहभान न राहतां तो आपल्या महालांत आरामाससुद्धा आला नाही. इकडेस बळीराजाचे विंध्यावली राणीने आपल्या खोजे आराधी सेवकांकडून एक खड्डा खणवून त्यांत त्यांजकडून जळाऊ लाकडे टाकवून त्या खड्ड्याजवळ ती आठ रात्री आणि आठ दिवस अन्न पाणी न घेतां पुढे एक पाण्याचा घट मात्र ठेवून आपल्या पतीस जय मिळून वामनाची पीडा दूर व्हावी म्हणून हरहर महावीराची प्रार्थना करीत घट्ट बसली होती. इतक्यांत अश्विन शुद्ध अष्टमीस रात्री बळीराजा रणांत पडल्याची बातमी तिला येऊन पोहचतांच तिने त्या खडड्यातील लाकडांस आग लावून त्यामध्ये उडी घालून ती मरण पावली. त्या दिवसापासून सती जाण्याची वहिवाट पडली असावी असा तर्क निघतो. जेंव्हा ती विंध्यावली सती आपल्या पतीच्या विरहामुळे अग्नीत उडी टाकून मरण पावली, तेव्हा तिच्या सेवेतील स्त्रिया व खोजे आराध्यांनी आपल्या आंगावरची वस्त्रे फाडून जाळली; आणि त्यांनी आपला ऊर बडवून टाळ्या पिटून त्या खड्ड्याचे भोवती राणीच्या गुणाचा आठव करून मोटा शोक केला. तो येणेप्रमाणे "माझे दयाळू राणीबाई ।। तुह्या डांगोरा गरजला ।।" इत्यादि. ही दुःखाची खपली उचकटू नये म्हणून विप्रांतील निर्दय ग्रंथकारांनी मागाहून संधी पाहून त्या खड्ड्याचा होम बनवून त्याविषयी अनेक दुसऱ्या लबाड्या कल्पून गंथांत लिहून ठेविल्या असाव्या, तिकडे बळी रणांगणी पडल्यावर बाणासुरानें वामनाशी एक दिवसभर हालिणीं हाल देऊन मोठ्या निकराने लदला, नंतर त्यांने आश्विन शुद्ध नवमीस रात्री आपली उरलेली फौज बरोबर घेऊन पळून गेला. यामुळे वामन इतका बदमस्त झाला की, बळीराजाच्या मुख्य राजधानीत मुळीच कोणी पुरुष नाहीं अशी संधी पाहून, त्याने आपल्याबरोबर सर्व फौज घेऊन अश्विन शुद्ध दशमीरा प्रातःकाली त्या शहरांत गेला; आणि त्याने तेथील एकंदर सर्व आंगणाचे सोने लुटने. त्याचा अपभ्रंश "शिलंगणांचे सोने लुटिले" हा होय. आणि आपल्या घरीं ताबडतोब निमून गेला पुढे तो घरांत शिरते वेळी त्याच्या स्त्रीने पूर्वी एक कणकीचा बली पट्टेने घरांत करून ठेविला होता, त्यास तिने आपल्या दाराच्या ऊंचऱ्यावर टेकून ती वामनास असें हणाली की, हा पहा बली पुनः तुमच्याबरोबर युद्ध करण्याकरितां आला आहे. यावरून वामन लगा कणकीच्या बळीस लाथ मान्न घरांत शिरला. त्या दिवसापासून आजतागायत विषया कित्येक कुलांत टावर्षी अश्विनामाशी निगपादणाणी त्यांच्या स्त्रियांनी कणकीचा अथवा तांदुळाचा बळी दाराच्या ऊबयाबाहेर करून ठेविलेला असतो, त्याचे उरावर डावा पाय एच-20 १४