पान:Samagra Phule.pdf/२०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६० महात्मा फुले : समग्र वाङ्मय भैरवाडी म्हणत असत, ज्याचा अपभ्रंश भराडी होय. यावरून बळीराजाचे राज्य या देशांत अजपाल म्हणजे दशरथाचा बाप यासारख्या इतर सर्व क्षेत्रपतीपेक्षा फार मोठे होते, म्हणूनच एकंदर सर्व क्षेत्रपती त्याच्या धोरणाने वागत असत; इतकेच नव्हे, परंतु त्यांपैकी सात क्षेत्रपती तर बळीस करभार देऊन त्याचे आश्रयाने वागत असत. यावरून त्याचे नांव सात आश्रयीत पडले होते; म्हणून सांपडते. सारांश, वर लिहिलेल्या सर्व कारणांवरुन बळीराजांचें राज्य फार मोठे होते; व तो अतिशय बलवान होता म्हणून त्याविषयीं एक जुनाट म्हणसुद्धा सांपडते. ती अशी की, "बळी तोच कान पिळी." बळीराजा जेव्हां कांहीं महत्त्वाचे काम आपल्या सरदारांस सोंपीत असे तेव्हां आपला दरबार भरवून तेथें तो एका तबकांत भंडार व नारळ यांसहित पानाचा विडा मांडून म्हणत असे की, ज्यास हे काम करण्याची हिम्मत असेल त्याने हा विडा उचलावा. यावरून ते काम शेवटास नेण्याची ज्यास हिंमत असे तो हरहर महावीराची शपथ घेऊन त्यांतील भंडार कपाळी लावून नारळासहित तो पानाचा विडा उचलून आपल्या माथ्यावर ठेवून पदरांत घेई. त्या वीरास बळीराजा ते काम सोंपीत असे. नंतर तो वीर बळीराजाची आज्ञा घेवून आपल्या फौजेसहित तळ उचलून शत्रूवर चालून जात असे. यावरून त्या संस्काराचें नांव तळ उचलणे हे पडले असावें. त्याचा अपभ्रंश "तळी उचलणे" हा होय. परंतु बळीच्या सर्व महावीरांपैकी भैरोबा व जोतीबा व नऊ खंडोबा हे तर रयतेच्या सुखाकरिता झटण्याची शर्थ करीत असत. याजकरिता एकंदर सर्व मन्हाट्यांनी हरएक शुभकार्य सुरु करण्याचे पूर्वी तळी उचलण्याचा संस्कार करण्याचे सोडले नाही. त्यांनी त्या संस्कारांत बहिरोबास, जोतीबास व खंडोबास देववत मानून त्यांची नांवे सामील करून तळी उचलू लागले. ती येणेप्रमाणे - "हर हर महादेव"; बहिरोबाचा अथवा जोतीबाचा चांग भला; सदानंदाचा उदय आणि मल्लुखान अहंकार, इतकेच नाही, परंतु बळीराजा आपल्या सर्व प्रजेसहित हरहर महादेवाच्या नांवानें आदितवारास पवित्र पाळीत असे. यावरून हल्लीचे महाठे म्हणजे मांग, महार, कुणबी आणि माळी इत्यादी लोक दर आदितवारी आपल्या घरांतील त्या कुळस्वामीच्या प्रतिमेवर पाणी घालून त्यास कोरड्या ओल्या भाकरीचा नैवेद्य दाखविल्याशिवाय ते आपल्या जिभेवर पाण्याचा थेंबसुद्धा ठेवीत नाहींत. धों वामनाने बळीराजाच्या सरहद्दीवर येऊन ठेपल्यानंतर काय केलें? जों वामन आपल्या सर्व फौजेसहित बळीच्या राज्यांत एकदम शिरून त्याचे रयतेस पीडा देत देत बळीच्या मुख्य राजधानीजवळ येऊन भिडला. त्यावरून बळीने आपल्या सर्व -- C- हरहर या शब्दाचा अपभ्रंश हुराहुरा होय, असा तर्क निघतो. कारण इंग्लिश लोकांत एक अति जुनाट वहिवाट सापडते ती अशी की, ते हुरा हुरा म्हटल्याशिवाय आनंदाची टाळी पिटीतच नाहीत व त्याचे सेनापती आपल्या फौजेस हुरा हुरा म्हटल्याशिवाय शंजूवर तुटून पडण्याला हुकूम देत नाहीत, असे कोठे कोठे त्यांच्या इतिहासांत सांपडते. " Hurrah Boys | loose the saddle or win the horse !"