पान:Samagra Phule.pdf/२००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गुलामगिरी १५९ त्याचे राहण्याचे मुख्य ठिकाण कोल्हापूरच्या उत्तरेस रत्नागिरी म्हणून एक पर्वत आहे त्यावर होते. त्याचप्रमाणे दक्षिणेत दुसरें क्षेत्र बळीच्या ताब्यात होते त्यास महाराष्ट्र म्हणत असत व त्यांतील सर्व क्षेत्रवासी लोकांस महाराष्ट्री म्हणत असत, त्याचा अपभ्रंश मराठे हा होय. तें महाराष्ट्र क्षेत्र अतिशय मोठे असल्यामुळे बळीराजाने त्याची नऊ खंडे केली होती. यावरून त्या प्रत्येक खंडाच्या अधिकाऱ्याचे नाव खंडोबा पडले होते, असें सांपडते व त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्याच्या हाताखाली एक अथवा दोनही प्रधान असत. त्याचप्रमाणे दर एक खंडोबाचे हाताखाली बहुत मल्ल असत, म्हणून त्यास मलूखान म्हणतात. त्यांपैकी जेजोरीचा खंडोबा हा होता. तो आपल्या आसपासच्या क्षेत्रपतींच्या ताब्यांतील मल्लांच्या खोडी मोडून त्यांस ताळ्यावर आणीत असे ; यास्तव त्याचे नांव मल्लअरी पडले आहे. त्याचाच अपभ्रंश मल्हारी हा होय. तो धर्मन्यायाने लढण्यामध्ये इतका अहंकार बाळगीत असे की, त्याने कधी आपल्यास पाट दाखविलेले शबूंवर वार केला नाही, म्हणून त्याचे नांव मारतोंड पडले होते त्याचा अपभ्रंश मार्तड हा आहे. तसाच तो दीनांचा कैवारी असे. तो गाण्याचा मोठा पोकी असे; कारण त्याने स्थापिलेला एक प्रसिद्ध मल्हार राग आहे. तो इतका उत्तम आहे की, त्याच्या आश्रयानें मिय्या म्हणून जो मुसलमान लोकांमध्ये प्रसिद्ध गायक होऊन गेला त्यानेसुद्धां दुसरा एक मल्हार केला आहे. याखेरीज बळीराजाने महाराष्ट्रात महासुभा आणि नऊ खंडांचा न्यायी असे दोन मुख्य अधिकारी वसूल व न्याय करण्याचे कामांत नेमले होते. त्यांचे हाताखाली दुसरे अनेक कामगार असत, असे आढळतें. हल्ली त्या महासुभ्याचा अपभ्रंश म्हसोबा झाला आहे. तो सर्व पीकपाण्याची यथाकाळी तपासणी करून त्याप्रमाणे सूट तूट घालून सर्वांस आनदांत ठेवीत असे. यामुळे हल्ली महाठ्यांत एक कूळ असें सांपडणार नाही की, ज्यांत ते आपल्या शिवारांतील भलत्या एखाद्या दगडास महासुभ्याचे नांवाने शेंदुराचे मांजण करून त्यास ऊद दाखवून त्याचे नांव घेतल्याशिवाय चाड्यावर मूठ ठेवणार नाहीत, शेतांत विळा घालणार नाहीत व खळ्यांतील राशीला अधोली लावणार नाहीत. तो बळीराजाचा सुभे करून वसूल करण्याचा कित्ता यवन लोकांनी घेतला असावा. असा तर्क निघतो. कारण त्या काळी यवन तर काय, पण मिसर देशांतले अनेक विद्वान येथे येऊन ज्ञान शिकून जात असत, असे पुरावे सांपडतात. तिसरें असे की, अयोध्येजवळ काशीक्षेत्राचे आसपास कांहीं बळी राजाचे ताब्यांत क्षेत्रे होती, त्यास दहावें खंड म्हणत असत. तेथील अधिकाऱ्याचे नांव काळभैरी होते म्हणून सांपडते. त्याचप्रमाणे तो अधिकारी पूर्वी काही दिवस काशी शहराचा कोतवाल होता असेंही आढळते तो गायनामध्ये इतका निपूण होता की, त्याने एक राग स्वतंत्र उत्पन्न केला आहे. त्या भैरव रागास तानसेनासारिखे महा प्रख्यात गवयीसुद्धां नमूनच राहिले व त्याने आपले कल्पनेने एक डोर नांवाचे वाद्य उत्पन्न केले. या डौर वाद्याची रचना इतकी विलक्षण आहे की, त्याची तालसुरामध्ये मृदंग, तबला वगैरे वायें बरोबरी मुळीच करू शकत नाहीत. मात्र त्याजकडेस दुर्लक्ष्य केल्यामुळे जसे तें प्रसिद्धीस यावे तसें आले नाही. त्याचे सेवकास