पान:Samagra Phule.pdf/१९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५८ महात्मा फुले : समग्र वाङ्मय धर्मानुसारी केलें आहे; परंतु त्यांनी त्यांतून एकाहि तरुणाच्या पित्याचा वध केला नाही, हे मोठे आश्चर्य होय! धों नारसिंहाची अशी फजिती झाल्यावर विप्रांनी प्रल्हादाचे राज्य घेण्याविषयी काही प्रयत्न केले किंवा नाही? जो --- विप्रांनी प्रल्हादाचे राज्य घ्यावें या इराद्याने अनेक त-हेचे चोरून उपाय केले; परंतु ते सर्व व्यर्थ गेले. कारण, प्रल्हादाचे पुढे डोळे उघडून त्याच्या मनांत विप्रांचे कपट दिसून आले. यावरून प्रल्हादानें विप्रांचा काडीमात्र विश्वास न धरतां सर्वांशी वरकांती स्नेह ठेवून, आपल्या राज्याची नीट व्यवस्था करून मरण पावला. नंतर त्याचप्रमाणे प्रल्हादाचा पुत्र विरोचन याने आपले राज्य संभाळून त्यास बळकटी आणून मरण पावला. विरोचनाचा पुत्र बळी हा मोठा पराक्रमी निघाला. त्याने प्रथम आपल्या आश्रयाने रहाणाऱ्या लहान लहान क्षेत्रपतीस दुष्ट दंगेखोरांच्या त्रासापासून सोडवून त्यांजवर आपले वर्चस्व बसविलें. नंतर त्याने आपले राज्य उत्तरोत्तर वाढविण्याचा क्रम चालविला. त्या वेळी विप्रांचा मुख्य अधिकारी वामन होता. त्यास तें सहन होईना. सबब बळीचे राज्य एकदम लढून घ्यावें म्हणून चोरून मोटी फौज तयार करून एकाएकी बळीच्या सरहद्दीवर येऊन ठेपला. वामन अतिशय लोभी, धाडसी आणि हेकेखोर होता. भाग६ वा बळीराजा, जोतीबा, महाटे, खंडोबा, महासुभा, नऊ खंडांचा न्यायी, भैरोबा, भराडी, सात आश्रयीत, तळी भरणे, आदितवारास पवित्र मानणे, वामन, पक्ष घालणे, विघ्यावली, घट बसविणे, बळीराजाचे मरण, सती जाणे, आराधी लोक, शिलंगण, तांदुळांचा बळी, दुसरा बळीराजा येण्याविषयीं भविष्य, बाणासुर, कुजागरी, वामनाचा मृत्यु, उपाध्ये, होळी, वीर काढणे, बळी-प्रतिपदा, भाऊबीज, इत्यादिकांविषयी. धों यावरून बळीराजाने काय केले? जो - बळीराजाने आपल्या राज्यांतील एकंदर सर्व सरदारांकडे व त्याच्या आश्रयाने राहणाऱ्या क्षेत्रपतींकडे ताबडतोब सांडणीस्वार पाठविले, आणि त्या सर्वांनी दुसरी कांहीं सबब न सांगतां आपल्या सर्व फौजा घेऊन त्याचे मदतीस यावे म्हणून सक्त ताकीद फिरविली. धों या देशांत बळीच्या ताब्यांत किती मोठे क्षेत्र होते? जो --या देशांत बळीराजाच्या ताब्यात अनेक ठिकाणी अनेक क्षेत्रे होती; शिवाय त्याच्या ताब्यांत सिंव्हलद्वीपाचे आसपास कित्येक बेटें होती ; असा तर्क निघतो. कारण, तेथे बळी या नावांचें एक बेट सुद्धा आहे. या देशांत दक्षिणेत कोल्हापुराचे पश्चिमेस बळीच्या ताब्यांत कोंकण व मावळांतील कांहीं क्षेत्रे होती; त्यावर जोतीबा या नांवाचा अधिकारी होता. १ -- --