पान:Samagra Phule.pdf/१९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

-- जों-- गुलामगिरी १५७ आणि त्याने आपल्या हातांतील वाघनखांनी हिरण्यकश्यपूचे पोट फाडून त्याचा वध केल्याबरोबर नृसिंहाने तेथील सर्व द्विजांसहित रात्रीचा दिवस करून आपल्या मुलखांत पळून गेला. इकडेंस नृसिंहाने प्रल्हादास फसवून असें अघोर कर्म केलेलें उघडकीस आल्यावरुन क्षत्रियांनी आर्य लोकांस मुळीच द्विवज म्हणण्याचे सोडून त्यांस विप्रिय म्हणूं लागले व पुढे त्या विप्रिय शब्दापासून त्यांचे नांव विप्र पडले असावें. पुढे क्षत्रियांनी नृसिंहास नारसिंह म्हणजे सिंहाची बायको असे निंद्य नांव दिले.शेवटी हिरण्यकश्यपूच्या पुत्रांतून कित्येकांनी तर नारसिंहास धरून आणून त्यास यथास्थित शासन करावे म्हणून दीर्घ प्रयत्न केला. परंतु नारसिंहाने हिरण्यकश्यपूचे राज्य घेण्याची मुळीच आशा सोडून केवळ मुलुखास आणि जिवास संभाळून पुढे कांही दुसरी गडबड केल्याशिवाय मरण पावला. धों तर मग नारसिंहाच्या अशा अघोर कर्मावरून त्याच्या नावाने मागे पुढे कोणी त्याची छी: थू करूं नये या भयास्तव विप्र इतिहासकर्त्यांनी काही काळ लोटल्यानंतर संधी पाहून नारसिंहाविषयीं तो खांबापासून जन्मला वगैरे नानात-हेच्या लबाड्या कल्पून इतिहासांत दाखल केल्या असाव्या, असे सिद्ध होतें. यांत कांहीं संशय नाही. कारण तो जर खांबापासून जन्मला असेल असे म्हणावें, तर त्याची कोणी तरी दुसऱ्याने नाळ कापून त्याच्या तोंडात दुधाचा बोळा दिल्याशिवाय तो कसा वांचला असेल. नंतर त्यास कोणी तरी दुसऱ्याने दाईचे अथवा वर दूध पाजल्याशिवाय तो लहानाचा मोठा कसा झाला असेल ! कदाचित तसेंहि घडून आलें असेल म्हणावें, तर तेणेकरून एकंदर जो सृष्टिक्रम चालत आला आहे, त्यास बाध येतो. या गप्पाड्या विप्र ग्रंथकारांनी नारसिंहास एकदम लाकडाच्या खांबांतून बाहेर काढिल्याबरोबर त्यास दुसरी कोणाची मदत न देतां आपल्या आपण इतका शक्तिमान दाढी मिशांचा ठोंब्या केला की, ज्याने लागलीच हिरण्यकश्यपूस मांडीवर घेऊन त्याचे पोट नखाने फाडून त्याचा वध केला. अरेरे !! जो पिता आपल्या समजुतीप्रमाणे पितृधर्न मनी आणून केवळ शुद्ध ममतेने आपल्या स्वपुत्राचे मन खऱ्या धर्माकडेस वळवावे म्हणून खटपट करीत होता, त्यास त्या सर्वसाक्ष आदिनारायणाच्या अवताराने असें देहान्त शासन करावें काय ! असें शासन अज्ञानी मनुष्याचा अवतारसुद्धा करणार नाही. तो आदिनारायणाचा अवतार असल्यामुळे त्याने त्या हिरण्यकश्यपूस दर्शन देतांच मी आदिनारायण आहे अशी त्याची खात्री करुन, पिता व पुत्र या उभयतांमध्ये सलोखा करून देण्याचे एकीकडेस टाकून त्याचा असा निर्दयपणाने वध केला, हे मोठे आश्चर्य होय. त्याच्याने जर त्या हिरण्यकश्यपूची उपदेश करून खात्री करवली नाही तरी तो सर्वांचे बुद्धीचा दाता कशाचा? यावरून असें सिद्ध होते की, नारसिंहामध्ये या आपल्या पुण्यातील एका शेणपुंज्या रांडेइतकी अक्कल नव्हती; कारण की जिनें, पहा, येथील एका प्रतिबृहस्पती म्हणविणाऱ्या एका विद्वानास केवळ आपल्या गोड बोलण्याचा तग लावून त्यास आपला गुलाम करून टाकिलें आहे. हल्ली हिंदुस्तानांत अमेरिकन आणि युरोपियन मिशनरींनी आपल्यातील कित्येक तरुणांस ख्रिस्ती