पान:Samagra Phule.pdf/१९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५६ महात्मा फुले : समग्र वाङ्मय मुलखात वारंवार हल्ले करून तेथील सर्व क्षेत्रवासी लोकांस पीडा देऊन अखेरीस त्याने एका लढाईत हिरण्याक्षास मारिलें. यावरून सर्व पृथ्वी (हिंदुस्थान) भर बाकीच्या सर्व क्षेत्रपतीस दरारा पोहचून ते कांहीस गडबडल्यासारिखे झाले; इतक्यात वराह मरण पावला. भाग ५ वा 55 -- -- नारसिंह, हिरण्यकश्यपु, प्रल्हाद, विप्र, विरोचन इत्यादिकांविषयीं. धों वराह मेल्यावर द्विज लोकांचा कोण अधिकारी झाला ? जों नृसिंह. धों नृसिंह स्वभावानें कसा होता ? जों नृसिंहाचा स्वभाव लोभी, कृत्रिमी, फितुरी, कपटी, घातकी, निर्दय आणि क्रुर होता. तो शरीराने सुदृढ असून अतिशय बलवान होता. धों त्याने काय काय केलें ? जों -- प्रथम त्याने हिरण्यकश्यपूच्या वधाविषयी विचार चालविला व आपणास त्याला मारिल्याशिवाय त्याचे राज्य मिळायचे नाही असे त्याचे मनांत पक्केपणीं समजले. हा त्याचा दुष्ट हेतु सिद्धीस जाण्याकरिता त्याने गुप्त रीतीनें बहुत दिवस प्रयत्न करुन, एका आपल्या द्विज पंतोजीकडून हिरण्यकश्यपूच्या प्रल्हाद या नांवाच्या मुलाच्या कोवळ्या मनावर आपल्या धर्माची मुलतत्त्वे ठसविल्यावरुन प्रल्हादाने आपल्या हरहर या नांवाच्या कुळस्वामीची पूजा करण्याची वर्ज केली. नंतर हिरण्यकश्यपूनें प्रल्हादाचें भ्रष्ट झालेले मन पुनः आपल्या कुळस्वामीची पूजा करण्याकडेस वळवावे म्हणून नानात-हेचे उपाय केले; तथापि नृसिंह हा प्रल्हादास आंतून मदत करीत असल्यामुळे हिरण्यकश्यपूचे सर्व प्रयत्न व्यर्थ गेले. शेवटी नृसिंहाने त्या अज्ञानी मुलास अनेक थापा देऊन त्याचे मन इतकें भ्रष्ट केले की, त्याने आपल्या पित्याचा वध करावा म्हणून त्याचे मन वळविलें खरें, परंतु तें अघोर कर्म करण्यास त्या मुलाची छाती होईना; सबब नृसिंहाने संधी पाहून ताबुतांतील वाघांच्या सोंगासारखे आपल्या सर्व आंगास रंग देऊन तोंडात मोठमोठाले खोटे दांत धरून लांब लांब केसांची दाढी लाविली आणि तो एक त-हेचा भयंकर सिंह बनला. हे सर्व कृत्रिम छपविण्याकरितां नृसिंहानें भरजरीचें एक ऊंची लुगडे नेसून गरतीसारिखा आपल्या तोंडावर लांबलचक पदर घेऊन मोठ्या थाटानें चमकत ठमकत त्या मुलाच्या मदतीने एके दिवशी त्याचे पित्याच्या विशाल मंदिरांत खांबाची गर्दी होती त्यांत जाऊन लपून उभा राहिला. इतक्यांत हिरण्यकश्युप सर्व दिवसभर राज्यकारभार करून थकल्यामुळे संध्याकाळ झाल्याबरोबर आपल्या मंदिरात एकांती येऊन निर्भयपणाने स्वथ्य विसांवा घेण्याच्या इराद्याने पलंगावर लोळत पडला न पडला, तोच नृसिंहानें जलदी करून डोईवरचा लुगड्याचा पदर कंबरेस गुंडाळून त्या लपलेल्या खांबांतून निघून हिरण्यकश्यपूच्या आंगावर एकदम जाऊन पडला