पान:Samagra Phule.pdf/१९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गुलामगिरी १५५ सिद्ध होते. परंतु भागवत वगैरे ग्रंथकर्त्यांचे मताप्रमाणे वराह हा आदिनारायणाचा अवतार असल्यामुळे त्याच्या सर्वसाक्षीपणाला व त्या समदृष्टीला बट्टा लागला की नाही? कारण वराह हा आदिनारायणाचा अवतार असल्यामुळे त्याच्या जननीने आपल्या वडील डुकर भावंडास मारून खाऊ नये म्हणून त्याविषयी त्याने पूर्वी काहीच बंदोबस्त करूं नये काय? अरेरे ! ! पद्मा डुकरीण ही वराह आदिनारायणाची आई ना! आणि तिने ती बालहत्या कशी केली ! आतां "बालहत्या" या शब्दाचा अर्थ फक्त बाळाचा वध करणे असा होतो, मग ते बाळ कोणाचें का असेना; पण हिने तर आपले पोटचे बाळ स्वतः मारून खाल्लें. तर अशा अन्यायाचा चांगला बोध होण्यासारखा कोशांत शब्दच सांपडत नाही, कदाचित् हिजला डांखिण म्हणावे तर "डांखिण सुद्धा आपल्या मुलास खात नाही, " अशी एक जुनाट म्हण आहे. पुढे त्या वराहाच्या पद्मा आईनें असें अघोर कर्म केल्यामुळे तिची नरकयातनेपासून सुटका व्हावी म्हणून तिने काही प्रायश्चित घेतलें असें कोटेंच सांपडत नाही. यास्तव मोठी हळहळ वाटते. धों वराहाचे डुकरीण आईचें नांव जर पद्मा होते, तर यावरून असे सिद्ध होते की, तिच्या डुकर पतीचे काही तरी दुसरे नाव असले पाहिजे की नको? जो -- पद्मा डुकरिणीचे पतीचें नांव ब्रह्मा होतें. धों -- यावरून पूर्वीची जनावरें मनुष्यासारिखीं आपआपल्यामध्ये ब्रह्मा, नारद आणि मनु अशी नावें देत होती व त्यांची नांवें या गप्पाड्या ग्रंथकारांस कशी समजली असावी? दुसरें असें की, पद्मा डुकरिणीनें वराहास त्याचे लहानपणी आपल्या स्तनाचें दूध पाजिलें असेल यांत कांही संशय नाही; परंतु पुढे काहीसा मोटा झाल्याबरोबर आपल्या ब्रह्मापतीसहित वराहास बरोबर घेऊन गावांतील खिंडारांतील अती सुकुमार फुलझाडांचा चारा चरण्याची त्यास संवय लावून मोकळी झाली असेल किंवा कसें हैं तो वराह अदिनारायणच जाणे, अशा नानाप्रकारच्या मुद्यांच्या गोष्टीविषयी त्यांच्या ग्रंथात पुरावे सापडत नाहीत, यास्तव मला असे वाटते की, वराह डुकरीपासून जन्मला म्हणून ग्रंथात लेख आहेत ते सर्व खोटे आहेत काय? अशा विपरित गोष्टी ग्रंथात लिहतेवेळी त्या ग्रंथकारास लाज कशी वाटली नाही? जो -- वाहवा! आणि तुम्हीखारिखेच तसल्या ग्रंथावरून त्यांच्या मुलाबाळांचे पाय धुऊन पितात. यावरून तुम्हाला लाज नाही म्हणावी, किंवा त्यांना? धों असो तुमच्या मते त्या अधिकाऱ्यांचे नाव वराह तरी कसे पडले असावें बरे? जो - कारण त्याचा स्वभाव व आचरण मोठे घाणेरडे असावें व तो जिकडे जाई तिकडे रानडुकरासारिखी मुसंडी मारून जयच मिळावी. यावरून महाप्रतापी जे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपु या उभयतांच्या मुलखांतील क्षत्रियांनी त्याचे नांव धिक्काराने डुक्कर (वराह) पाडिले, त्यामुळे तो फार चिडला असावा आणि त्याने या गोष्टींचा मनात दांत धरून त्याच्या - --