पान:Samagra Phule.pdf/१९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

-- १५४ महात्मा फुले : समग्र वाङ्मय गेल्यास त्याचा परिणाम मत्स्यासारिखा होईल व तेणेकरून आपला वेळ फुकट जाईल, अशी खात्री झाल्यावर मी आपल्यास पुढे विचारितों, की कच्छाने बंदरावर उतरल्याबरोबर काय केले? जो त्याने प्रथम त्या बंदरापासून ज्या पर्वतावर मत्स्याची टोळी घेयामध्ये सांपडली होती, त्या पर्वताचे अलीकडील बाजूपासून बहुतेक तेथील मूळच्या क्षेत्रवासी लोकांस घेरा घालणाऱ्या लोकांसहित एकंदर पिटाळून नंतर तो आपल्या लोकांस सोडवून एकंदर सर्व त्या क्षेत्रांचा भूदेव म्हणजे भूपती होऊन डुरक्या फोडीत बसला. धों -बरें, ते कच्छानें क्षेत्रांतून पिटाळून लाविलेले क्षत्रिय कोणीकडेस गेले! जो - समुद्रावरून दुजी इराणी अथवा आर्य लोकांची टोळी आली असें म्हणण्याबद्दल, घाबरल्यामुळे, द्विज आले, द्विज आले, असा शब्द करीत त्या पर्वताचे पलीकडेस जाऊन कश्यप या नांवाच्या क्षेत्रपतीच्या पाठोपाठ निघालें, यावरून कच्छ आपल्या बरोबर कांही फौज घेऊन त्या पर्वताचे पलीकडील बाजूने खाली उतरला आणि त्याने तो पर्वत आपल्या पाठीवर घेऊन म्हणजे पाठीशी घालून अथवा पाठीमागे टाकून कश्यपाच्या राज्यांतील क्षत्रियांस जसजशी इराणांतून मदत येत गेली तसतशी पीडा देऊ लागला. पुढे कश्यपानें जरी तो पर्वत कच्छापासून माघारी ध्यावा म्हणून मोठे प्रयास केले; तथापि कच्छाने आपल्या मरणापावेतो तो पाठीत घातलेला पर्वत त्या क्षेत्रपतीच्या हाती दिला नाही व आपली रणभूमी सोडून एक पाऊलसुद्धां मागे हटला नाही. भाग ४ था -- -- वराह. जों -- वराह आणि हिरण्याक्ष यांविषयी धों कच्छ मेल्यामागे द्विजांचा कोण अधिकारी झाला? जों धों -- वराह हा डुकरापासून जन्मला असें भागवत वगैरे इतिहासकर्त्यांनी लिहून ठेविलें आहे, याविषयी आपले मत कसे काय आहे ? वास्ताविक विचाराअंती असें ठरतें की, मनुष्य आणि डुकर या उभयतांमध्ये एकंदर सर्व गोष्टी ताडून पाहतां चमत्कारिक अंतर दिसून येते व त्याविषयी तुझी पक्की खात्री व्हावी म्हणून येथे उदाहरणाकरितां फक्त ते आपल्या बच्चास जन्म दिल्यानंतर कसकशी वर्तणूक करितात, याविषयी आपण थोडासा विचार करुन पाहूं म्हणजे झाले. मनुष्य स्त्री आपल्या मुलास जन्म दिल्याबरोबर त्यास काडीमात्र इजा न देतां त्यांचे पालन पोषण करूं लागते; परंतु डुकरीण कुत्रींसारखी प्रथम आपल्या जन्म दिलेल्या बच्चास एकदम खाऊन नंतर बाकीच्या दुसऱ्या बच्चांस जन्म देते. यावरून वराहाच्या डुकरीण मातेने प्रथम आपल्या डुकर जातीच्या बच्चास खाऊन नंतर या मानव डुकरास व्याली असावी, असें