पान:Samagra Phule.pdf/१९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गुलामगिरी १५३ त्या मत्स्यीणीचे अंडे कोणत्या चतुर मर्दानें फोडून त्यांतून मत्स्यबाळ बाहेर काढिले असावे बरें? कारण, जरी आतां युरोप व अमेरिका खंडात पुष्कळ सुधारणा होऊन मोठमोठे नामांकित विद्वान वैद्यशास्त्रात निपूण झाले आहेत, तथापि त्यापैकी एकाच्चानेंहि छातीला हात लावून मो मस्त्विणींचे अंडे फोडून त्यांतून जिवंत मत्स्याचें बच्चे काढीन, असे म्हणवणार नाही. असो. बरें, ते अंडे पाण्यांत आहे, म्हणून तो मोठ्या महत्त्वाचा निरोप कोणत्या अमर मल्याने पाण्याबाहेर येऊन त्या पाणबुड्यास कळविला असेल व त्या जळचर निरोप्याची भाषा मानव पाणबुड्यास कशी समजली असेल, अशा नानाप्रकारच्या शकांचे त्या इतिहासांतल्या लेखावरून यथास्थित समाधान करून घेता येत नाही. यास्तव त्याविषयी असे अनुमान सिद्ध होते की, मागाहून कांही लबाड लोकांनी संधी पाहून एकंदर प्राचीन ग्रंथात ही दंतकथा कोंबली असावी. धों बरें, तो टोळीचा मत्स्य अधिकारी आपल्या लोकांसहित कोणत्या ठिकाणी येऊन उतरला? जो पश्चिम समुद्रांतून येऊन तो एका बंदरावर उतरला. धों मत्स्याने बंदरावर उतरल्यावर काय केले? जो मत्स्याने शंकासूर या नांवाच्या क्षेत्रपतीस मारून त्याचे राज्य घेतले. पुढे तें शंकासुराचे राज्य आर्य लोकांच्या ताब्यात मत्स्याच्या मरणकाळपावेतों बिनधोक राहिले. मत्स्य मरतांच शंकासुराच्या लोकांनी आपले राज्य परत घ्यावें या इराद्याने मल्याचे टोळीवर मोठ्या निकराने हल्ला केला. घों पुढे त्या हल्ल्यामध्ये काय परिणाम झाला? जो त्या हल्ल्यामध्ये मत्स्याचे टोळीचा पराभव झाल्यामुळे तिने रणभूमी सोडून पळ काढिला. नंतर शंकासुराच्या लोकांनी तिचा पाठलाग केल्यामुळे ती अखेरीस एका डोंगरावर जाऊन झाडीत लपून राहिली. इतक्यांत इराणांतून आर्य लोकांची दुसरी एक मोठी टोळी कचव्यामधून बंदरात येऊन उतरली व ते कचवे मचव्यांपेक्षा काहीसे मोटे असल्यामुळे पाण्यावर कासवांसारिखें सावकाश चालत असत, या कारणामुळे त्या टोळीच्या अधिकाऱ्याचे टोपण नांव कच्छ पडले. भाग ३ रा कच्छ, भूदेव अथवा भूपती, क्षत्रिय, द्विज आणि कश्यपराजा यांविषयी. धों - मासा आणि कांसव यामध्ये एकंदर सर्व गोष्टी ताडून पहातां त्यामध्ये थोडे थोडे अंतर दिसून येते; परंतु इतर काही गोष्टींत म्हणजे जलांत रहाणे, अंडी घालणे व त्यांस फोडणे इत्यादींनी ते एकमेकांशी साम्यता पावतात. यास्तव कच्छ हा कासंवापासून जन्मला म्हणून भागवत वगैरे इतिहासकांनी ग्रंथात लिहून ठेविले आहे. त्याविषयी विचार करू --