पान:Samagra Phule.pdf/१९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५२ महात्मा फुले

समग्र वाङ्मय

ब्रम्हासारखी शेषशाईविषयी चौकशी करूं लागलों तर त्यापासून आपल्याला काडीमात्र फायदा न होतां आपला उभयतांचा वेळ मात्र व्यर्थ जाणार नाही; कारण त्यांनी मुळीच त्या बिचान्यास उताणे पाहून त्याच्या बेंबीपासून हे चार तोंडाचे मूल निर्माण केले आणि अशा मुळीच चीत झालेल्या दीनावर खंब ठोकणे यामध्ये मोठा पुरुषार्थ होईल असे मला वाटत नाही. भाग २रा -- मत्स्य आणि शंखासूर यांविषयी. धों वामनापूर्वी इराणांतून या देशात आर्य लोकांच्या एकंदर किती टोळ्या आल्या असाव्या? जो या देशात आर्य लोकांच्या टोळ्या जलमार्गाने अनेक आल्या. धों त्यांपैकी पहिली टोळी जलमार्गाने लढाऊ गलबतांवरून आली किंवा कसे? जो -- लढाऊ गलबते त्याकाळी नव्हती, सबब ती टोळी लहान लहान मचव्यांतून आली व ते मचवे माशासारिखे त्वरेने पाण्यावरून चालत असत, म्हणून त्या टोळीच्या अधिकाऱ्यांचे टोपणनांव मत्स्य पडले असावें. धों तर मग ब्राह्मण इतिहासकर्त्यांनी भागवत वगैरे ग्रंथात तो टोळीचा अधिकारी मल्यापासून जन्मला म्हणून लिहिले आहे, हे कसे? जो -- त्याविषयी तूंच विचार करून पाहा की, मनुष्य आणि मासा यांच्या अवयवांत, आहारात. निद्रेत, मैथुनांत आणि उत्पत्तीत किती अंतर आहे? आणि त्याचप्रमाणे त्यांच्या मगजांत, काळजात, फुफ्फुसात, आंतड्यात, गर्भ वाढण्याच्या जागांत आणि प्रसूत होण्याच्या मार्गात किती चमत्कारीक अंतर आहे! मनुष्य हा जमिनीवर गुजारा करून राहाणारा प्राणी होय. तो पाण्यात पडल्याबरोबर गटांगळ्या खाऊन आपल्या प्राणास मुकतो. मासा हा सर्व काळ पाण्यांत राहून आपला गुजारा करणारा प्राणी होय व त्यास पाण्याबाहेर काढिल्याबरोबर तो तरफडून मरतो. स्त्रिया बहुतकरून एकाच मुलास जन्म देतात; परंतु मस्त्यीण प्रथम पुष्कळ अंडी घालून काही काळानंतर त्या सर्वांस फोडून त्यांतून आपली सर्व बच्ची बाहेर काढिते. आतां ज्या अंड्यामध्ये हे मस्त्यबाळ होते. मात्र तिने पाण्याबाहेर आणून फोडिलें आणि त्यांतून तिनें तें मत्स्यबाळ बाहेर काढिले असेल असे म्हणावें तर, तिचा प्राण पाण्याबाहेर कसा वांचला असेल? कदाचित तिने पाण्यांतच तें अंडे फोडून मत्स्यास बाहेर काढिले असेल असें म्हणावे, तर त्या मत्स्य मानवासारख्या बालकाचा प्राण पाण्यांत कसा वांचला असावा? कोणी अशी शंका घेतली की, मनुष्यांतील एखाद्या सराईत पाणबुड्याने पाण्यात तळी बुडी मारून मत्स्य बालक ज्या अंड्यामध्ये होते तें अंडे मात्र ओळखून जमिनीवर घेऊन आला असेल. असो, तसे का होईना, पण पुढे