पान:Samagra Phule.pdf/१९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गुलामगिरी १५१ जो बरें, पुढे त्या जन्मलेल्या ब्राह्मण बालकास ग्रामद्याने आपल्या स्तनाचे दूध पाजिल अथवा वर दूध लावून त्यास लहानाचे मोठे केलें, याजविषवीं तरी काही लेख आहे काय? घों नाही. जो सावित्री ही ब्रम्हयाची पत्नी असताहि त्याने त्या मुलाचे ओझें मुखात नऊ महिने वागवून त्यास जन्म देण्याचे व त्यांचे पालन पोषण करण्याचे लचांड आपल्या माथ्यावर को घेलले? हे मोठे आश्चर्य होय, धों त्याची बाकीची तीन डोकी तर या लचांडापासून दूर होती की नाही? काय ? त्या रांड्या राघोबाला असा पोरीतला घरकुंडी खेळ आवडला? जो ---आता त्यास रांड्या राघोया म्हणावे तर, त्याने सरस्वती नांवाच्या कन्येशी व्यभिचार केला व त्यामुळे त्याचे आडनांव बेटीचीद पडले. याच निंद्य कर्मावरून त्याचा कोणी आदरसत्कार (म्हणजे पूजा) करीत नाहीत. घों ब्रह्मास जर खरोखर चार तोडे होती, तर त्याचप्रमाणाने त्यास आट रखने, चार वेव्या, चार मूत्रद्वारे आणि चार मलद्वारे असली पाहिजेत; पण त्याविषयी खात्री होण्याजोगा लेख कोटेंच आढळत नाही. पुढे त्याचप्रमाणे शेषशाईस लक्ष्मी पत्नी असता, त्याने आपल्या थेंबीपासून है चार तोंडाचे मूल कसे निर्मिले याविषयी विचार कर लागल्यास शेपशाईचीसुद्धा ब्रह्मासारखी दशा होईल. जो वारतविक विचारअंती असे ठरते की ब्राह्मण लोक हे समुद्राचे पलीकडेस जो इराण देश आहे त्या देशांतील मूळचे राहणारे होत. पूर्वी त्यास इराणी किंवा आर्य लोक म्हणत असत, असे कित्येक इंग्लिश ग्रंथकारांनी त्यांच्याच ग्रंथावरून सिद्ध केले आहे. प्रथम त्या आर्य लोकांनी मोठमोठ्या टोळ्या करून या देशांत येऊन अनेक स्वाऱ्या केल्या य येथील बहुतेक राजांच्या मुलुखात वारंवार हल्ले करून मोठा धिंगाणा केला. पुढे वामनाचे मागून आर्य लोकांचा ब्रह्मा या नावाचा मुख्य अधिकारी झाला. त्याचा स्वभाव फार हड्डी होता. त्याने आपल्या कारकीर्दीत येथील आमच्या मूळ पूर्वजांस रणगिणी जिंकून आपले दास केले व त्याने आपले लोक आणि हे दास या उभयांतामध्ये हमेशा भेद रहावा म्हणून अनेक त-हेचे नेम बांधिले. या सर्व कृत्यांवरून ब्रह्मा मेल्यानंतर आर्य लोकांच्या मूळच्या नांवाचा आपोआप लोप होऊन त्यांचे नांव ब्राह्मण पडले. नंतर मागाहून मनूसारखे अधिकारी झाले. त्यांनी बांधिलेल्या नेमांचा धिक्कार मागे पुढे कोणी करू नये, या भयारतय त्यांनी ब्रह्माविषयीं अनेक तहत-हेच्या नवीन कल्पित गोष्टी रचिल्या व त्या गोष्टी ईश्वरेच्छेनेच झाल्या आहेत असा त्या दासांच्या मनावर ठसा उमटावा म्हणून त्यांनी शेषशाईचे दुसरे आंधळे गारुड रचिले आणि संधि पाहून काही काळाने त्या सर्व लेखांचे ग्रंथ बनविले. त्या ग्रंथाविषयी शुद्र दासांस नारदासारिख्या पटाईत बायकातील भाऊजींचे टाळ्या पिटून उपदेश केल्यामुळे ग्रामाचे महत्व सहजच वाढले. आता आपण ज्या