पान:Samagra Phule.pdf/१९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जो -- --- १५० महात्मा फुले : समग्र वाङ्मय थों -- कारण, ती त्या विद्वान ब्राह्मणांच्या म्हणण्याप्रमाणे अधम आणि दुराचारी असेल, यास्तव तूर्त लिजला म्लेंछांच्या पंक्तीस बसवा. आम्ही भूदेव, आम्ही सर्व वर्गामध्ये श्रेष्ठ, असे मोठ्या गर्वाने नेहमी बोलणारे अशांस जन्म देणारी मूळमाता ब्राह्मणी ना? आणि तूं तिजला म्लेंछांचे पंक्तीस कसे यसवितोस? तिला तेथील दारू व गोमांसाचा घमघमाट कसा आवडेल ? हे तूं मोटें अनुचित बोलतोस बाबा! धों -तुम्हीच कित्ताक वेळां भर सभेत बोललां की, ब्राह्मणांचे मूळ पूर्वज जे ऋषिवर्य, ते श्राद्धाचे निमित्ताने गाई मारून त्यांच्या मांसाची नानात-हेची पक्वान्ने करून खात होते आणि आता मात्र त्यांच्या मूळ मातेस घाण येईल म्हणून म्हणतां हे कसें ! तुम्ही इंग्रजी राज्यास हवाती चिंतून थोडे दिवस थांवा, म्हणजे हत्तींचे बहुतेक सोंवळे ब्राह्मण, रेसिडेंट, गव्हर्नर वगैरे कामदारांची आपल्यावर जास्ती मेहेरबानी व्हावी, याकरितां त्यांच्या टेबलावरचे उरलेले मांसाचे तुकडे बुटलेराच्या वाटणीसदेखील येऊ देणार नाहीत असें तुम्हांस दिसेल, आतांशा बहुतेक महार बुटलेर ब्राह्मणांच्या नावाने आंतल्या आंत कुरकुरण्यास लागले आहेत हे तुम्हाला ठाऊक नाही? मनूनेच ब्राह्मणीच्या उत्पत्तीविषयी लिहून ठेविलें नाहीं. सबब या दोषांचे खापर त्याच्याच बोडक्यावर फोडा. त्याविषयीं तू अनुचित बोलतोस म्हणून तुम्ही मला कां दोष देतां ? पुढे चालू द्या- जो बरें तुझी मर्जी, तसे का होईना. आतां ब्राह्मणास जन्म देणारें जें ब्रम्द्याचे मुख ते दरमहाचे दरमहा दूरसें झाल्यामुळे तो चार दिवस सोंवळा होऊन बसत होता किंवा लिगाइतिणीसारखा राख लावून पाक होऊन घरांतील कामकाज करीत होता याविषयीं मनूचा काही लेख आहे काय? धों नाही. परंतु ब्राह्मणांच्या उत्पत्तीस ब्रह्मा हा मूळ कारण आहे आणि त्यास लिंगाइतिणीचा उपदेश कसा आवडला असेल बरे? कारण, हल्लींचे ब्राह्मण, लिंगाईत विटाळ पाळीत नाहीत म्हणून त्यांचा वीट मानितात. जो --तर यावरून तूंच विचार करून पाहा की, ब्रह्मयाचे मुख, याहू, जंघा आणि पाय, या चार ठिकाणच्या योनी दूरशा झाल्यामुळे त्यास एकंदर सोळा दिवस सोवळे होऊन वसावें लागले असेल, असे जर म्हणावें तर त्यांचे घरांतील खटाटोप कोण करीत असे ? याविषयी तरी मनूचा काही लेख आहे काय? घों नाही. जो--- बरें, तो गर्भ ब्रम्ह्याच्या मुखांत संभवल्या दिवसापासून नऊ महिन्यांचा होईतोपावेतों कोणत्या ठिकाणी राहून वाढला याविषयी काही मनूने म्हटले आहे काय? घों -- नाही. --