पान:Samagra Phule.pdf/१९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गुलामगिरी १४९ जोतीराव आणि धोंडीबा यांचा संवाद जो -- भाग १ला ब्रह्म, उत्पत्ति, सरस्वती आणि इराणी अथवा आर्य लोक यांविषयीं. घों - युरोपखंडातील इंग्रज, फ्रेंच वगैरे दयाळू सरकारांनी एकत्र होऊन दास करण्यांची बंदी केली, याजवरून त्यांनी ब्रह्मदेवाच्या नियमांस हरताळ लाविला; कारण मनुसंहितेत लिहिले आहे की, ब्रह्मदेवाने आपल्या मुखापासून ब्राह्मणांस उत्पन्न केले आणि त्या ब्राह्मणांची फक्त सेवाचाकरी करण्याकरितां त्याने आपल्या पायर्यापासून शूद्रांस उत्पन्न केले, इंग्रज वगैरे सरकारांनी दास करण्याची बंदी केली. याजवरून त्यांनी ब्रह्मयाच्या आजेस हरताळ लाविला म्हणून तुझे म्हणणे आहे. तर या भूमंडळावर इंग्रज वगैरे अनेक नानाप्रकारचे लोक आहेत, त्यांस ब्रह्मयाने आपल्या कोणत्या अवयवापासून उत्पन्न केलें याविषयी मनुसंहितेत कसा काय लेख आहे ? घों याजविषयी सर्व ब्राह्मण म्हणजे विद्वान व अवियान असे उत्तर देतात की, इंग्रज वगैरे लोक अधम, दुराचारी असल्यामुळे मनुसंहितेत त्या लोकांविषयी मुळीच लेख नाही. जो यावरून तुझ्या मतें ब्राह्मणांमध्ये अधम, दुराचारी मुळीच नाहीत की काय? घों -शोधाअंती इतर लोकांपेक्षां ब्राह्मणांमध्ये अधिक अधम व अधिक दुराचारी आहेत असें आढळते. जो तर मग अशा अधम व दुराचारी ब्राह्मणांविषयीं मनुसंहितेत कसा लेख आला ? घों यावरून असे सिद्ध होते की, मनूनें जी उत्पत्ति लिहिली आहे ती अगदी खोटी आहे; कारण ती सर्व मनुष्यांस लागू पडत नाही. जो -- म्हणूनच इंग्लिश वगैरे लोकांतील ज्ञात्यांनी ब्राह्मणांतील पुस्तककत्वाच्या लबाध्या जाणून दास करण्याची बंदी केली. ब्रह्मा हा सर्व मनुष्यमात्रांच्या उत्पत्तीस खरोखर कारण असता तर त्यांनी दास करण्याची बंदीच केली नसती. मनूने चार वर्णाची उत्पत्ति लिहिली आहे, ती एकंदर सर्व सृष्टिक्रमांशी ताडून पाहिली म्हणजे सर्व खोटी आहे असे आपणास कळून येतें. घों म्हणजे ती कशी? जो ब्राह्मण ब्रम्ह्याच्या मुखापासून झाले; परंतु एकंदर सर्व ब्राह्मणांची मूळ माता ब्राह्मणी ही ब्रम्ह्याच्या कोणत्या अवयवापासून झाली याविषयी मनूने काहीच लिहून ठेविलें नाही, हे कसे?