पान:Samagra Phule.pdf/१८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४८ महात्मा फुले : समग्र वाङ्मय वध, परभु, रामोशी, जिनगर वगैरे लोक, परशुरामाचा पराभव झाल्यामुळे त्याने आपला जीव दिला आणि चिरंजीव परशुराम यांस आमंत्रण इत्यादिकांविषयी. भाग २ वेदमंत्र, जादूचे वजन, मुठ मारणें, देव्हारे धुमविणे, जप, चार वेद, ब्रह्मघोळ, नारदशाई, नवीन ग्रंथ, शूद्रास ज्ञान देण्याची बंदी, 'भागवत व मनुसंहिता यांचा असंगतपणा इत्यादिकांविषयीं. भाग १० दुसरे बळी, ब्राह्मण धर्माची फजिती, शंकराचार्याचे कृत्रिम, नास्तिक मत, निर्दयपणा, प्राकृत ग्रंथकार, कर्म आणि ज्ञानमार्ग, बाजीराव, मुसलमानांचा द्वेष आणि अमेरिकन व एकाँच उपदेशकांनी ब्राह्मणांचा कृत्रिमरूपी कोट फोडला इत्यादिकांविषयी. भाग ११ पुराण सांगणे, बडे वगैरे परिणाम, शूद्र संस्थानिक, कुळकर्णी, सरस्वतींची प्रार्थना, जप, अनुष्ठाने, देवस्थाने, दक्षिणा, मोठ्या आडनांवांच्या सभा इत्यादिकांविषयी. भाग १२ वतनदार भट कुळकर्णी, युरोपियन लोकांचे वसाहतीची जरूरी, विद्याखात्याच्या तोंडावर काळोखाचा डाग, युरोपियन कामगारांची अक्कल गुंग कशी होते इत्यादिकांविषयीं. भाग १३ मामलेदार, कलेक्टर, रेव्हिन्यु, जज्ज आणि इंजिनियर खात्यांतील भट कामगार इत्यादिकांविषयी. भाग १४ युरोपियन कामगारांचा निरूपाय, खोतांचें, वर्चस्व, पेनशन घेऊन निर्वेध झालेल्या युरोपियन कामगारांनी सरकारांत गांवोगावच्या हकिगती कळविण्याची जरूरी, धर्म आणि जात्याभिमान इत्यादि. भाग १५ सरकारी शाळाखाते, म्युनिसिपालिटी. दक्षणाप्राइज कमिटी व भट वर्तमानपत्रकर्ते यांची जूट आणि शूद्रांदि अतिशूद्रांच्या मुलांनी विद्या शिकं नये म्हणून भट लोकांचा कट इत्यादि. भाग १६ ब्रह्मराक्षसांच्या पीडेचा धिःकार पवाडा अभंग