पान:Samagra Phule.pdf/१८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४६ महात्मा फुले : समग्र वाङ्मय लढले त्यांचा त्यांनी एक वर्गच वेगळा केला. त्यांचा पुर्तेपणी सूड उगविण्याकरितां त्यास य त्यांची जी पुढे संतती होईल तिजला त्यांच्यातीलच लोकांनी म्हणजे हल्ली ज्यास माळी, कुणबी वगैरे म्हणतात, तर त्यांनी त्यांचा स्पर्शदेखील करूं नये असें भट लोकांनी त्यांचे मनात भरविले. असे जेव्हां झाले तेव्हां अर्थातच त्यांचा व्यापार वगैरे बंद होऊन अनास मोताद झाले, त्याजमुळे त्यांस मेल्या गुरचे मांस खाणे भाग पडलें. ते त्यांचे कृत्य पाहून हल्लीचे शूद्र जे आपणास मोट्या अहंपणाने माळी, कुणबी, सोनार, शिंपी, लोहार, सुतार इत्यादि मोठमोठ्या संवा केवळ तो तो धंदा केल्याचे योगाने म्हणवून घेतात तर तेच लोक आपले पूर्वज एकाच घराण्यातील असता त्यांचे पूर्वज स्वदेशासाठी भट लोकांशी मोठ्या निकराने लढले, सबब भट लोकांनी त्यांची अशी दुर्दशा करून त्यांस अन्नअन्न करावयास लाविलें, है आतील गुह्य त्यांच्या लक्षात न येतां ते त्यांचा भट लोकांचे सांगण्यावरून द्वेष करावयास शिकले. हर! हर! किती तरी ते ईश्वराचे अपराधी आहेत की, त्या सर्वांचा इतका निकट संबंध असून एकाद्या सणावाराला ते त्यांचे दारी दुरून अन्न वगैरे मागण्यास आले असता ते त्यांस झिडकारून देतात व केका केव्हां काठीसुद्धा घेऊन त्यांचे आंगावर मारण्यास जातात, असो, याप्रमाणे 'भट लोकांनी आपल्याशी इतर लोकांनी जसजशी वर्तणूक केली त्या त्याप्रमाणे त्यांच्या जाति यांधून त्यांस सजा अथवा वरकांतिचा आश्रय देऊन सर्यस्थी आपले अंकित करून ठेविले. जेव्हांपासून शूद्रादि अतिशूद्रांमध्ये भट लोकांनी जातिभेद उत्पन्न केला तेव्हापासून त्या सर्वांची मते भिन्न भिन्न झाली. मग अर्थातच त्यास त्यांची पाहिजे तशी व्यवस्था करण्यास सवड सापडली. याविषयीं एक जगप्रसिद्ध म्हण आहे. ती अशी की, "दोघांचे भांडण आणि तिसऱ्याला लाभ" म्हणजे भट लोकांनी शूद्रादि। अतिशुद्रांमध्ये आपआपसांत वैमनस्य आणून आपण त्यांचे जिवावर ऐषआराम भोगीत आहेत. सारांश वर सांगितलेंथ आहे की, या देशांत इंग्रज सरकार आल्यामुळे शूद्रादि अतिशून, भटाच्या काविक दास्यत्वापासून मुक्त झाले खरे, परंतु आम्हांस सांगण्यास मोटें दुःख वाटते की, अद्यापि आमचे दयाळू सरकारचे शूद्रादि अतिशूद्रास विद्या देण्याविषयी दुर्लक्ष असल्यामुळे से अज्ञानी राहून भट लोकांचे बनावट ग्रंथांच्या संबंधाने त्यांचे मानसिक वास झालेले आहेत व त्यांस सरकारजवळ दाद मागण्याचे प्राण राहिले नाही. भट लोक त्या सांस प्रापंचिक सरकारी कामांत किती लुटून खातात, याजकडेस आमचे सरकारचे मुळीच लक्ष पोहचलें नाही, तर त्यांनी दयाळू होऊन या गोष्टीकडेस नीट रीतीने लक्ष पुरयायें व त्यांस भट लोकांचे मानसिक दास्यत्वापासून मुक्त करावे अशी आम्ही आपले जगजियंत्याजवळ शेवटली प्रार्थना करितों. हैं पुस्तक करतेवेळी माझे मित्र रा. रा. विनायकराव बापूजी भंडारकर व रा. रा. सा. राजजा लिगू यांनी मला उत्तेजन दिलें सबब मी त्यांचे फार फार आभार मानतो. १ जून १८७३ जो. गो. 30