पान:Samagra Phule.pdf/१८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गुलामगिरी १४५ मारामार पडत असे. त्यांतून प्रातःकाळी तर फारच अडचण पडे, कारण त्या वेळेस सर्व वस्तूंची छाया लांब पडते आणि अशा प्रसंगी जर कदांचित् कोणी शूद्र रस्त्याने जात असतां समोरचे रस्ताने भटसाहेबांची स्वारी येत आहे हे पाहून त्यांच्या आंगावर आपली छाया न पडावी या भीतीस्तव घडी दोन घडी आपला खोळंबा करून रस्त्याचे एके बाजूस होऊन त्यास बसावे लागत असे. भटजी गेल्यानंतर तो आपले कामास जाई, एखादे वेळेस याची छाया भटाचे आंगावर चुकून पडली तर तो भट लागलीच त्यास मरेमरेतोपर्यंत मारी आणि ताबडतोब नदीवर जाऊन स्नान करी. त्यापैकी कित्येक लोकांस रस्त्यांत थुकण्याची देखील पंचाईत; याजकरितां त्यांस भटवस्तीतून जाणे झाल्यास आपल्याबरोबर धुंकण्याकरितां एखादें भांडे ठेवावे लागत असे. जर त्यांचा थुका जमिनीवर पडून भटसाहेबाने पाहिले म्हणजे त्या मनुष्याने असे समजावें की, आतां आपले आयुष्य पुरे भरले. याप्रमाणे अनेक संकटें भोगिता भोगतां ते फार त्रासून गेले व केव्हां बापासून सुटका होईल याची बाट, जसा एखादा फार दिवस तुरंगांत टाकिलेला कैदी आपले इष्टमित्रांस, मुलांबाळांस व 'भाऊबंदांस भेटण्याविषयी अथवा स्वतंत्रतेने इकडे तिकडे फिरण्याविषयी मोटे उत्सुकतेने सुटकेचे दिवसाची वाट पहातो, त्याप्रमाणे पहात आहेत, इतक्यांत दैववशात ईश्वरास त्यांची करुणा येऊन या देशांत इंग्रज लोकांचे राज्य झाले व त्यांच्याकडून ते भट लोकांचे ते कायीक दास्यत्वापासून मुक्त झाले. ते इंग्रज सरकारचे त्याजबद्दल फार फार आभार मानितात व सर्वस्वी त्यांचे ते ऋणी आहेत. त्यांचे उपकार ते कधी विसरणार नाहीत. त्यांनी त्यांस आज शेकडो वर्षांचे भट लोकांचे कैदखान्यांतून मुक्त करून त्यांचे मुलाबाळांस सुखाचे दिवस दाखविले. ते नसते तर भट लोकांनी त्यांस केव्हांच धुळीस मिळविले असते. याजवर कोणी अशी शंका घेतील की, आज भट लोकांपेक्षां शूद्रादि अतिशूद्र लोकांचा भरणा सुमारे दसपट अधिक असून भट लोकांनी शूद्रांदि अतिशूद लोकांस कसे धुळीस मिळविले असते? याचे उत्तर असे आहे की, एक शहाणा मनुष्य दहा अज्ञानी मनुष्यांचे आपणाकडेस मन वळऊन त्यांस तो आपले ताब्यात ठेऊ शकतो. आणखी दुसरे असे की, ती दहा अज्ञानी मनुष्ये जर एकाच मताची असती तर त्यांनी त्या शहाण्या मनुष्याचें कांहीं चालू दिले नसते; परंतु ते दहाजण निरनिराळे दहा मतांचे असल्यामुळे शहाण्या मनुष्यास त्यांस फसविण्यास काहीच अडचण पडत नाही. त्याप्रमाणे शूद्रादि अतिशूद्रांची मते एकमेकांस मिळू नये म्हणोन पूर्वी भट लोकांनी एक मोठा कावेबाज विचार शोधून काढिला. त्या लोकांचा समाज जसा जसा वाढत चालला त्याप्रमाणे 'भट लोकांस भिती वाटू लागली आणि त्यांनी त्याच्यामध्ये परस्पर वाकडेपणा राहील अशी काही तजवीज योजली. तरच आपला येथें राहाण्याचा टिकाव लागून सदासर्वदां ते लोक वंशपरंपरे आपले व आपले वंशजांचे गुलामगिरीत राहून आपणास काही श्रम न करिता त्यांचे निढळाचे घामाने मिळविलेले उत्पन्नावर बिनधास्त मौजा मारितां येतील, हा त्यांचा विचार सिद्धीस जाण्याकरितां जातिभेदाचें थोतांड उपस्थित करून, त्यांजवर अनेक स्वहितसाधक ग्रंथ केले बते त्या अज्ञानी लोकांचे मनांत भरविते. त्यांपैकी जे लोक भट लोकांबरोबर मोटें निकराने एच.२२ १३