पान:Samagra Phule.pdf/१८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गुलामगिरी १४३ तितक्याचविषयी थोडासा विचार केला असतां मनास मोठे दुःख होते, कारण परशुरामाने जेव्हा त्या गरभार स्त्रियांचा पाठलाग केला तेव्हा त्यांस किती दुःख झाले असेल बरें? स्त्रिजातीस बहुत करून पळण्याची मारामार, त्यांतून त्यापैकी कित्येक मोठ्यांच्या व कुलीन स्त्रिया असल्यामुळे घराचा ऊंबरादेखील ज्यांस ठाऊक नाही, जें कांही त्यांस लागेल तें सर्व गडीमाणसे आणून देत; सारांश ज्यांनी पतींचे श्रेय चितून त्यांचे जिवावर सुखांत दिवस काढिले, तर त्यांजवर पोटांतील गर्भाचे ओझें घेऊन सूर्याच्या प्रखर उन्हात आडमार्गाने पळण्याचा प्रसंग गुदरणे म्हणजे त्यांच महासंकटकाळच ओढवला असे म्हटले पाहिजे. त्यांस पळण्याची सवय मुळीच नसल्यामुळे पायांत पाय गुंतून धडाधडा ठेचा लागून कधी खडकांवर, कधी डोंगरांचे कपारीवर पडत असतील आणि तेणेकरून काहींच्या कपाळांस, काहींच्या कोपरास, काहींच्या गुडध्यांस व काहींच्या घोट्याला लागून रक्तांच्या धारा चालत असतील व परशुराम मागून येत आहे हे ऐकून तसेंच घाबरें पळत असतील मार्गाने जात असता त्यांचे कोमल पायांमध्ये कांटे टोचून काटेरी झाडांनी अंगावरची वस्त्रे फाटून त्यांची शरीरें भोसकली असतील व तेणेकरून शरीरांतून रक्त वाहवले असेल. त्यांचे उन्हामध्ये पळतां पळतां पाय चटचट पोळून त्यांची कमळाच्या देठासारखी सुकुमार नीलवर्ण कांति परम आरक्तता पावली असेल व तोंडास फेंस येऊन डोळे पाण्याने गच्च भरून आले असतील. तोंडाकडेस एक एक दोन दोन दिवस पाणीदेखील नेलें नाहीं, सबब कळमळून पोटांतील गर्भ पोटांत गडबड फिरत असतील, त्यांस असे वाटले असेल की, आतां धरणी जर फाटते तर फार बरे होईल म्हणजे आंत आम्ही उडी टाकून या दुष्टापासून मुक्त होऊ. त्यांनी डोळे भरून आणून ईश्वराची प्रार्थना केली नसेल काय ? की, हे प्रभो आमच्यावर काय हा कहर गुदरविलास. अरे!! आम्ही स्वतः बलहीन म्हणून आम्हांस अबला म्हणतात व आम्हांस आमचे पतींचें जें कांहीं बल होते तेही या दुष्टानें हरण केले, असे तुला माहीत असतां निर्दय होऊन आमचा किती तरी अंत पहातोस. अरे, आमचे पतींचे ज्याने प्राण घेऊन आम्हां अबलांवर शस्त्र धरिलें व त्यांजमध्ये जो मोठा पुरुषार्थ मिरवितो अशा दुष्टाचे अपराध पाहून येवढा तूं समर्थ असतां तोंडात बोट घालून स्तब्ध बसलास काय! याप्रमाणे त्या दीनमुख होऊन ईश्वराचा धावा करीत आहेत तो इतक्यांत दुष्ट परशुरामाने त्यांस धरून चालविलें नसेल काय? मग त्यांच्या शोकाला काय विचारावयांचे आहे? त्यांपैकी काही स्त्रियांनी फार आक्रोश करून आपले प्राण त्यागिले नसतील काय? व बाकीच्या स्त्रियांनी अतिशय लीन होऊन त्या दुष्टाची विनवणी केली नसेल काय? की, अहो परशुराम, आमचे आपणाजवळ इतकेंच शेवटचे मागणे आहे की, आमचे पोटी जन्म पावणारे अनाथ बालकांचा प्राण घेऊ नका, आम्ही सर्व मिळून तुम्हाजवळ पदर पसरितों, आम्हास येवढें दान द्या. पाहिजे असल्यास आमचे प्राण घ्या, परंतु आमचे मुलांचे जीव वांचवा. आमचे आपण पति मारल्यामुळे आम्हांस अकाली वैधव्य प्राप्त होऊन आम्ही सर्व सुखांला मुकलों, आतां आम्हांस पुढे मुलेबाळे होण्याची मुळी आशा राहिली नाही त आमने